<
भारत सरकारच्या एन.आर. एल. एम .अभियानातील महिला होतील संवादात सहभागी
जळगाव दि.११(प्रतिनिधी): आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत माहे मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ या ७५ आठवड्यांच्या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव”निमित्त मा. पंतप्रधान भारत सरकार दिनांक १२ ऑगस्ट २०२१रोजी दुपारी १२:३० वा देशातील सर्व राज्यातील एन आर एल एम अभियान अंतर्गत स्वयंसहायता समूह ,ग्रामसंघ,शेतकरी उत्पादक संघ,उत्पादक गट तसेच पंचायत राजस्वयंसहायता समूह, ग्रामसंघ ,शेतकरी उत्पादक संघ उत्पादक गट तसेच पंचायतराज संस्थांमधील सदस्य यांच्याशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील एन आर एल एम अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान(MSRLM)अंतर्गत उमेद अभियानातील २० हजार महिला स्वयंसहायता समूहातील २ लाख महिलांपैकी १ लाख ७८ हजार महिलांनी कार्यक्रमास अद्याप नोंदणी केलेली आहे.
सदरील कार्यक्रम हा दूरदर्शन वर तथा उद्या प्रत्यक्ष पाहण्यासाठी http://pmindiawebcast.nic.in यावर बघता येणार आहे.सदरील कार्यक्रमास जिल्ह्यातील ना.मंत्री महोदय,मा.खासदार,मा.आमदार,मा.ना.जि.प.अध्यक्षा जिल्हाधिकारी कार्यालय येथून उपस्थित राहणार आहेत.तथा तालुका स्तरावरून प.स. सदस्य,लोकप्रतिनिधी पंचायत समिती स्तरावरून सहभाग नोंदवणार आहे.सदरील कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उत्तयान( PMFME) अंतर्गत जिल्ह्यातील एकूण चार महिला गटांना नऊ लक्ष वीस हजार रुपयांचा लाभ खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.आणि 21 लक्ष रुपयांचे फिरता निधी व समुदाय गुंतवणूक निधी महिला बचत गटांच्या खात्यावर कार्यक्रमा दरम्यान वर्ग केला जाणार आहे.सदरील कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व महिला स्वयंसहायता समूहाच्या सदस्य लोकप्रतिनिधी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
अलका रावण गोसावी