<
जळगाव (प्रतिनिधी) – केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने जळगाव शहरातील सर्व रोटरी क्लब अध्यक्ष व सचिवांचा सत्कार शहरातील IMA सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. रोटरीचे जळगाव शहरात ९ क्लब असून जळगाव शहरात रोटरी क्लब गेल्या ७ दशकापासून कार्यरत आहे. केशवस्मृतीच्या स्थापनेला देखील ३० वर्ष पूर्ण झाले असून दोन्ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात त्यांची ओळख व रोटरीच्या निर्वाचीत पदाधिकाऱ्याना आगामी वाटचालीस शुभेच्छा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. केशवस्मृतीचे सचिव श्री रत्नाकर पाटील यानी पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून गत ३० वर्षाची केशवस्मृतीची वाटचाल मांडत समाजावर केशवस्मृतीच्या कार्याचा झालेला परिणाम मांडला.
रोटरीचे प्रेसिडेंट इंन्क्ल्यु लक्ष्मिकांत मणियार यानी आपल्या मनोगतात गेल्या १०० वर्षापासून रोटरी पूर्ण जगभरात कार्यरत असून जागतिक स्तरावर पोलिओ निर्मुलन चळवळ हि पूर्णपणे रोटरीने घेतलेला पुढाकार आहे. जळगाव शहरात देखील रोटरीचे ९ क्लब व त्यातील सर्व सदस्य सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेतात. केशवस्मृतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा गौरव करणे हि आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत सामाजिक कामात दोन संस्था कार्यरत आहेत व त्यांनी परस्परांचा गौरव करणे हे कौतुकास्पद असून त्यांना रोटरी मध्येच पॉल हरीस फेलोशिप मिळाले असल्याचे सांगत गत आठवणींना उजाळा दिला. सामाजिक कामात केशवस्मृती व रोटरी सारख्या संस्था ह्या जेथे कोणी नाही तेथे आम्ही या म्हणीनुसार कार्यरत असून सामाजिक उपक्रमाची ओळख व्हावी, नवनविन कल्पना समोर याव्यात हा या सत्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
यांचा झाला गौरव :
नवनियुक्त अध्यक्ष सचिवांचा सत्कार केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड यांनी केला. १) रोटरी क्लब ऑफ जळगाव ईलाईट नितीन इंगळे, संदिप असोदेकर २) रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन डॉ. विवेक वडजीकर, श्री तारिक अब्दुल रऊफ ३) रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल श्री राजेश चौधरी, श्री विलास देशमुख ४) रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट श्री कृष्णकुमार वाणी, श्री अनुप असावा ५) रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट श्री विरेंद्र छाजेड, श्री प्रणव मेहता ६) रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स श्री निरज अग्रवाल, श्री विपुल पटेल ७) रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटी श्री उमंग मेहता, डॉ निरज अग्रवाल ८) रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल्स श्री स्वप्निल जाखेटे, श्री सचिन जेठवानी ९) रोटरी क्लब जळगाव श्री संदिप शर्मा, श्री मनोज जोशी असिस्टंट गव्हर्नर डॉ गोविंद मंत्री, विष्णु भंगाळे, संगिता पाटील, लक्ष्मिकांत मणियार यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड, असिस्टंट गव्हर्नर डॉ गोविंद मंत्री, विष्णु भंगाळे, संगिता पाटील, लक्ष्मिकांत मणियार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास येवलेकर, सागर येवले यांनी केले तर आभार निळकंठ गायकवाड यांनी मानले. यशस्वितेसाठी केशवस्मृतीच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.