<
जळगांव:- आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष होत असल्याच्या, पार्श्वभूमीवर “आत्मनिर्भर नारीशक्ती से संवाद” या कार्यक्रमानिमित्त मा. पंतप्रधान नरेद्रजी मोदी यानी भारतातील NRLM(National Rural Livelihood Mission) अंतर्गत ग्रामीण महिला बचत गटाच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.
सदरील ऑनलाईन माध्यमातुन झालेल्या कार्यक्रमाची सुरूवात श्री गिरीराज सिंग, कॅबिनेट मंत्री भारत सरकार यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविक करताना, दिन दयाल उपाध्याय अंत्योदय योजना अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आयोजिका मिशन योजनेची माहिती सांगुन कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मा. प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातुन भारतील विविध राज्यातील उत्तम बचत गटांच्या महिलांनी केलेले उत्कृष्ट कार्याचे पुस्तकाचे प्रकाशन केले, कार्यक्रमात श्री. पशुपती पारस केंद्रीय खाद्य संस्करण मंत्री यांनी आत्मनिर्भश भारत अंतर्गत (PMFME) प्रधानमंत्री खाद्य उन्नयन योजना महिलांसाठी १० लाख पर्यत सबसीडी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले, कार्यक्रमांदरम्यान मा. पंतप्रधान यांनी मध्यप्रदेश, मणीकर, तामीळनाडू मधील बचत गटांच्या महिलांशी संवाद साधुन “नारी शक्ती सशक्त, तर देश सशक्त” याचा नारा दिला.
सदरील कार्यक्रमास जिल्हयातील एकूण १ लक्ष ७८ बचत गटांच्या सदस्यांनी विविध माध्यमातुन बघीतला, सदरील कार्यक्रमास तालुका, गाव पातळीवर तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष “उमेद” अभियानातील कर्मचारी यांनी उत्तम नियोजन करून सकारात्मकतेने बघीतला.
सदरील कार्यक्रमास जिल्हयातील सर्व लोकप्रतिनीधी विविध ऑनलाईन माध्यमातून सदरील कार्यक्रमास उपस्थित होते. जिल्हयास्तरावरून सदरील कार्यक्रम मा.ना. रंजनाताई प्रल्हाद पाटील, मा. अध्यक्षा जि.प. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. पंकज आशिया, मा.प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, जिल्हा व्यवस्थापक हरेश्वर भोई, लोकेश जोशी, पी.आर.चौधरी इ. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातुन ऑनलाईन माध्यमातुन सहभाग घेतला.
(दिगंबर लोखंडे) प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा जिल्हा अभियान सहसंचालक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जळगांव