<
अमळनेर दिनांक 14 ऑगस्ट 2021-
श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित स्वच्छता पंधरवाडा निमित्त दि.14 ऑगस्ट 2021 रोजी, वेळ- सकाळी 11.00 ते 12.30 वा. गुगल मिट app वर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, या वेबिनारचे उदघाटन मा. प्रा.डॉ.पंकजकुमार नन्नवरे (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी संचालक श्री अभिजित भाऊ भांडारकर, प्रा.डॉ. संजय शिंगाने (विभागीय समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, चोपडा) प्रा.डॉ. मनीष करंजे(जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जळगाव) प्रा. डॉ. जगदिश सोनवणे (विभागीय समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पारोळा) हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील(पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर) हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. जगदिश सोनवणे (विभागीय समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पारोळा) यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कोरोणाच्या कालखंडात महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा परिचय करून दिला.
उद्घाटनपर भाषणात बोलताना प्रा. डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट केले. राष्ट्रीय सेवा योजना हे एक व्रत असून त्या आधाराने स्वतःच्या जीवनात, सोबतच मानवी जीवन अधिकाधिक विकसित करता येऊ शकते, स्वतःसोबत समाजाचा विकास शाब्दिक काम याचा मंत्र त्यांनी दिला, कोणत्याही प्रकारे अपेक्षा न ठेवता, प्रामाणिक पणे काम करणे, कार्याला संधी समजणे, या वर भर दिला. कार्यक्रमाचे व्याख्याते प्रा डॉ नितीन बडगुजर, विभागीय समन्वयक, रासेयो विभाग, जळगाव यांनी कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक स्वच्छता व सामुदायिक आरोग्य – महत्त्व आणि सामजिक जबाबदारी या विषयावर सहभागी श्रोत्यांना मार्गदर्शन केले.
प्रा डॉ बडगुजर यांनी कोरोणाला संपविण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता आणि सामुदायिक स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे, शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमांचे पालन करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, यावर प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा.डॉ.संजय शिंगाने यांनी रासेयो स्वयंसेवकांना त्यांच्या कार्याची जाणीव आणि समजोपयोगीता स्पष्ट केली. तसेच मा. प्रा. डॉ. मनीष करंजे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे कर्तव्य आणि त्यांनी पुढच्या काळात स्वरक्षणासाठी आणि समाज प्रबोधनासाठी घ्यावयाची जबाबदारी या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी या उपक्रमासाठी रासेयो विभागाचे आणि विद्यार्थी करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
सदर विद्यापीठ स्तरीय ऑनलाइन वेबिनार करिता विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि समाजकार्य महाविद्यालय चोपडा, अमळनेर, जळगांव, धुळे आणि अन्य महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. अस्मिता सरवैया(रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी, अमळनेर) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. अस्मिता धनवंत सरवैया(रा से यों कार्यक्रम अधिकारी) प्रा. विजयकुमार वाघमारे (रा से यों – सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) सर्व आयोजन समिती सदस्य प्रा. डॉ. भरत खंडागळे, प्रा. डी आर ढगे, प्रा.डॉ. सागरराज चव्हाण, प्रा. चंद्रशेखर बोरसे, प्रा.डॉ. श्वेता वैद्य, प्रा.डॉ. अनिता खेडकर, प्रा. उदय महाजन, श्री अनिल वाणी (कार्यालयीन अधिक्षक) व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकानी परिश्रम घेतले.