<
वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता होते निवडीचे निकष
जळगाव दि. १७(प्रतिनिधी): देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायती या हागणदारीमुक्त अधिक (ODF PLUS) म्हणून घोषित करण्यात आल्या.
केंद्र व राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) टप्पा 2 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 1 मध्ये वैयक्तीक शौचालय यावर भर देण्यात आलेला होता. मात्र स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 मध्ये हागणदारी मुक्त अधिक (ODF PLUS) ही संकल्पना राबवण्यात येत आहे.
” हागनदारी मुक्त अधिक म्हणजे ग्रामीण भागातील गावांसाठी हागणदारीमुक्त चे मानांकन प्राप्त गावांमध्ये ,शौचालयाचे बांधकाम/ पुनर्प्रस्थापितकरण, सामुदायिक शौचालय संकुल, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व इतर अनुषंगिक कामे पूर्ण करून स्वच्छता शाश्वत रित्या कायम ठेवणे”
यात वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावरील स्वच्छतेची कामे पूर्ण करून जिल्ह्यात हागणदारीमुक्त अधिक(ODF PLUS ) मानांकानाचा दर्जा प्राप्त करणे करिता विविध निकषांची पूर्तता करून नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त अधिक पदे(ODF PLUS) घोषित करायचे आहेत.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील या ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यात आले आहेत.- अमळनेर- मंगरूळ, भुसावळ- सुसरि, भडगाव- बोरणार, बोदवड -हरणखेड, चाळीसगाव- चैतन्य तांडा, चोपडा- घुमावल बुद्रुक, धरणगाव -मुसळी, एरंडोल- पिंपरी बुद्रुक, जळगाव- जळगाव खुर्द, जामनेर- करमाड, मुकताईनगर- चिंचोल,कोथळी, पाचोरा- सारोळा बुद्रुक, वाणेगाव, पारोळा- सबगव्हाण, रावेर -चिनावल, यावल- बोराळे