<
मुंबई – (प्रतिनिधी)- टचटर्निग अपाॅच्युनेटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाईल्ड हेल्प ही संस्था मागील तीन दशकांपासून वंचित मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत आहे. आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक पालकत्व योजनेतून ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत व टिकावित यासाठी संस्था ३००० मुलांचे पालकत्व समाजातील सजग घटकांच्या सहाय्याने यशस्वीपणे सांभाळते.
मुलांच्या शैक्षणिक गरजा त्याअंतर्गत पूर्ण केल्या जातात. कोरोनाच्या भीषण महासाथीत २०२० च्या शैक्षणिक वर्षात सर्व साहित्य मुलांपर्यंत पोहोचविण्यात आले होते. या सर्व मुलांच्या दूरध्वनीवरून सर्वे केल्यानंतर कक्षात आले की संपूर्ण कोरोनाकाळात मुलांच्या पोषणावर आर्थिक हलाखीमुळे विपरीत परिणाम झालेले आहेत. शिवाय मानसिक दृष्टयाही मुले खचलेली व त्रासलेली आढळून आली. या मुलांचे दूरध्वनीवरून समुपदेशन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक साहित्याचे किट मुलांपर्यंत सप्टेंबर पर्यंत पोहोचविण्याची तयारी टच कार्यालयात सुरू झाली आहे.
या शैक्षणिक शैक्षणिक साहित्याबरोबरच या मुलांना वैयक्तिक स्वच्छतेसाठी, साबण, नेलकटर तसेच त्यांच्या प्रोटिन पावडर चा समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या अत्यंत निराशाजनक वातावरणात मनाला उधारी देऊन कठीण परिस्थितीत सघर्षासाठी प्रेरणा देणारे वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्वर’ आणि साने गुरूजींचे श्यामची आई यांची एक-एक प्रत प्रत्येक मुलांसाठी शैक्षणिक साहित्याच्या जोडीने विशेषकरून पाठविण्यात येत आहे.