<
जळगाव : येथील इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे महिलांच्या उपचार कक्ष क्रमांक ६ व पीएनसी वॉर्डात पौष्टिक आहार वाटप करण्यात आला. तसेच महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, जनऔषध वैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता बावस्कर, इनरव्हील क्लबच्या असोसिएशन विश्वस्त मीनल लाठी, अध्यक्षा नीता परमार उपस्थित होते. यावेळी स्तनपानाची शास्त्रोक्त माहिती आणि स्तनपानचे महत्व विशद करणारी पोस्टर्स इनरव्हील क्लबतर्फे रुग्णालयाला देण्यात आली.
यानंतर कक्षात जाऊन उपचाराला दाखल महिलांना खजूर, खोबरा वाटी, राजगिरा लाडू आदी पौष्टिक आहार वाटप करण्यात आला. प्रसंगी सदर रुग्ण महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. अनुराधा वानखडे, इनरव्हीलच्या सचिव बबिता मंधान, दिशा अग्रवाल, पल्लवी शिंपी उपस्थित होते.