<
महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांच्या प्रयत्ननांना यश
भडगांव (प्रतिनिधी) : टोणगांव भडगांव येथील शहीद वीर जवान निलेश रामभाऊ सोनवणे यांना दि.10 जुलै 2021 रोजी देशसेवा कार्य बजावित असतांना सियाचिन लेह लद्दाख़ येथे विरमरण आले.
पाचोरा रोड टोणगांव-भडगांव चौकास शहीद वीर जवान निलेश रामभाऊ सोनवणे चौक असे नामकरण करण्यात यावे याबाबत महिला दक्षता समिती अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी म.जिल्हाधिकारीसो, प्रांताधिकारीसो,तहसीलदारसो, पोलीस निरीक्षकसो, मुख्याधिकारीसो यांना लेखी निवेदनाद्वारे असंख्य टोणगांव भडगांव शहर व तालुका वासियांची मागणी केली आहे असे नमूद केले होते.
प्रशासनाने सदर मागणीचा आदरपूर्वक विचार करून 15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वातंत्र अमृत महोत्सवी पदार्पण वर्षी शासन आदेशान्वये प्रांताधिकारी डॉ.बांदल, तहसीलदार सागर ढवळे, पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, मुख्याधिकारी विकास नवाळे, नवनियुक्त मुख्याधिकारी रविंद्र लांडे, विरमाता मातोश्री, बंधू राव सोनवणे, बाळा सोनवणे, बापू सोनवणे सह सर्व परिवार सदस्य, नगरसेविका योजना पाटील, ऐडव्होकेट संजीदा खान, प्रहार जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, शरद राजपूत, प्राचार्य डी.डी.पाटील, रविंद्र पाटील, शरद पाटील, शिक्षक संघ अध्यक्ष विक्रम सोनवणे, शैलेश पाटील, आतिश पाटील, खान्देश रक्षक ग्रुप, नगरपरिषद, तहसील, पोलिस स्टेशन सहकारी कर्मचारी, सामाजिक संघटना, टोणगांव भडगांव रहिवाशी यांचे उपस्थितीत शहीद जवान निलेश रामभाऊ सोनवणे यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण अभिवादन करून करण्यात आले. सदर नामकरणाने शहीद वीर जवान निलेश रामभाऊ सोनवणे यांच्या विरमरणास खरी प्रेरणादायी श्रद्धांजली ठरली.