<
वडजी/भडगांव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे वडजी टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात रक्षाबंधन निमित्त पर्यावरणपुरक हस्तनिर्मित राखी बनवा स्पर्धेत 35 स्पर्धक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी पर्यावरण पुरक वस्तुंचा वापर करुन सुंदर राख्यांची निर्मिती केली.
स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 7 वी गटातुन प्रथम प्रियंका रविद्रं न्हावी, द्वितीय नयन देविदास अमृतकार, तृतीय गायञी ज्ञानेश्वर बोरसे यांनी यश संपादन केले. इयत्ता 8 वी ते 10 वी गटातून प्रथम दिशा देविदास अमृतकार, द्वितीय चंद्राशु फुलचंद आहिरे ,तृतीय कल्याणी अनिल पाटील यांनी यश संपादन केले. परीक्षक जेष्ठ शिक्षक ई. एम. पाटील, एस जे पाटील, के.जी.महाजन यांनी परिक्षण केले.
हरीत सेना प्रमुख एस.जे.पाटील यांच्या मार्गदर्शनात शालेय आवारातील वृक्षांना राखी बांधुन पर्यावरण संवर्धंनाचा संदेश दिला. यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रमुख वाय.डी.भोसले, डी.एम.पाटील, आर.एम.पाटील, श्रीमती व्ही.टी.बिर्हाडे, श्रीमती पी. जी. पाटील, प्रसिद्धि प्रमुख़ आर.एच.बोरसे सह सर्व समिती सदस्य यांनी सहभाग नोंदविला. मुख्या.प्राचार्य डी.डी.पाटील, प्र.प्राचार्य मा.सरपंच बी.वाय.पाटील ,इंग्लिश मेडीअम प्राचार्य पो.पा.के.ए.मोरे, समन्वयक प्रा.संदीप पाटील, नियोजन समिती अध्यक्ष जे.एच.पवार यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी वर्ग कोरोना पार्श्वभूमिवर फिजिकल डिस्टेंट ठेऊन उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, सचिव जिल्हा दूध संचालिका डॉ.पूनमताई पाटील, संचालक महाराष्ट्र मंत्रालय सचिव प्रशांतराव पाटील, मा.नगराध्यक्ष श्यामकांत भोसले, इंजि. राहुल पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्ताराधिकारी गणेश पाटील, केंद्रप्रमुख संजय न्याहिदे, रविंद्र सोनवणे, मा.सभापती मनीषाताई पाटील, नगरसेविका योजनाताई पाटील आदि मान्यवरांनी शुभेच्छया दिल्या आहेत.