<
जळगांव(प्रतिनिधी)- उस्मानियापार्क येथील रहिवासी दानियल शेख जे एंजल फुड या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत व रोज रात्री व दिवसा भुकेल्या लोकांना जेवण देत असतात ते दानियल शेख यांनी रविवार २२ ऑगस्ट रोजी मुगल गार्डन शिवाजी नगर येथील रिक्षाचालक सय्यद कलिम अहमद यांची मुलगी नावे सईदा अयशकूरा बी यांच्याकडे साखरपुड्यासाठी गेले असता काही नातेवाइकांनी पुढाकार घेऊन सदर साखरपुड्याला निकाह( विवाह)मध्ये परिवर्तीत करण्यात यश मिळाले.
सदरची बाब जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी च्या निदर्शनास येताच अध्यक्ष फारुक शेख, शहराध्यक्ष सय्यद चाँद, संचालक सलीम मोहम्मद, हारून शेख, जुलकर नैन, अल्ताफ शेख यांनी मुगल गार्डन येथील मस्जिद ए असरारूल काद्रिया येथे जाऊन प्रत्यक्ष निकाह मध्ये सहभागी होऊन वर दानियल, वधू चे वडील सैयद कलीम, वरा चे मामा सैयद आसिफ,काका इब्राहिम खान, वधूचे बंधू दानिश अहेमद, बंधू परवेज आसिफ यांचे शाल बुके देऊन अभिनंदन केले.
साखरपुड्याला आले आणि लग्न करून गेले
सामाजिक कार्यकर्ते व रीलायेबल मोटर ड्राईव्हीग चे दानियल शेख यांना समाज कार्याची आवड सोबतच समाजामध्ये ज्या अनिष्ट प्रथा सुरू आहे त्या संपवण्यासाठी त्यांनी आपले मामा सय्यद आसिफ व काका इब्राहिम खान यांच्या कडे प्रस्ताव दिला की आजच निकाह करून वधूला आपल्या घरी घेऊन जायचे आहे. लागलीच वधूकडील मंडळी व खासकरून आत्या अमिनाबी, हसना बी, फातेमा बी, वधूचे काका सलीम सय्यद, रफिक रजवी यांनीसुद्धा त्यास होकार दिला आणि दुपारीच विवाहाच्या तयारीला सुरुवात झाली.
मस्जिद मध्ये झाला निकाह
सदरचा स्तुत्य निकाह मस्जिद ए असरारूल काद्रिया मध्ये सुन्नी जामा मस्जिद नियामतपुराचे इमाम खतीब जाबीर हजरत यांनी खुतब ए निकाह पढवुन दुवा केली. या निकाहा चे वकील म्हणून नंदुरबारचे पठाण असलम खान, साक्षीदार म्हणून यावल चे शमसोद्दीन खान व शब्बीर खान रशीद खान यांनी भूमिका पार पाडली.
जळगाव शहरात उच्चशिक्षित तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते यांनी अशा विवाहाची नोंद घेऊन आपल्या नातेवाईकांचे तसेच आपल्या मित्र परिवाराचे साखरपुड्याचे मोठ मोठ्या कार्यक्रमाचे जेवणाच्या पंगतीचे आयोजन न करता लहान साखरपुड्यातच विवाहा चे आयोजन करून समाजाला एक चांगला संदेश द्यावा असे आव्हान जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी विवाह स्थळी उपस्थितांना केले.
विवाहाला यांची सुद्धा होती संमती व उपस्थिती
एमआयएमचे महानगराध्यक्ष दानिश अहेमद, अब्दुल रहमान, सय्यद तबरेज, सय्यद परवेज, सय्यद इम्रान, शाहरुख सय्यद, मोहसिन खाटीक, नाजीम पेंटर, समीर शेख ,वसीम अख्तर, अबुरेहान सर, जाकिर हाजी, अब्दुल रहमान मलिक, जावेद सय्यद