<
जळगाव – (प्रतिनिधी) – केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवा वस्ती विभाग हरी विठ्ठल नगर येथे रोटरी क्लब ऑफ इलाईट जळगाव व केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू माती पासून गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ ईलाईटचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर यांनी मुलांना पर्यावरण पूरक शाडू मातीची गणेशाची स्थापना का करावी व त्यांचे विसर्जन कसे करायचे याबद्दल सेवा वस्तीतील मुलांना माहिती दिली.
डॉ. वर्षा चौधरी यांनी मुलांना गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले तर रोटरी क्लब ऑफ ईलाईट चे सदस्य डॉ वैजयंती पाध्ये, चारू इंगळे, बिना चौधरी, वैशाली चौधरी, काजल असोदेकर, कविता वाणी यांनी मुलांना गणेश मुर्ती बनविण्यास मदत केली. कार्यशाळेला वस्तीतील ४४ मुलांनी सहभाग घेऊन आकर्षक अशा बाप्पाच्या मुर्त्या साकार केल्या. कार्यशाळेस केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवावस्ती विभागाच्या सहप्रकल्प प्रमुख सौ. मनीषा खडके, व्यवस्थापिका सौ .स्नेहा तायडे, सौ मंगला अहिरे, सौ.राधिका गरुड, सौ.ज्योति बारी, सौ.कांचन सांगोळे यांनी परिश्रम घेतले.