<
पाळधी येथील शिवाय फूड उद्योगाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
शेतीमालाचे मुल्यवर्धन करण्याकरिता शेतकऱ्यांच्या सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. पाळधी परिसरात लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असे दोन्ही उद्देश शिवाय फूड उद्योगामुळे सफल होतील.
परिसरातील इतर युवकांना नितीन ज्ञानेश्वर पाटील व अमोल अशोक पाटील यांनी सुरू केलेल्या शिवाय फूड उद्योगामुळे प्रेरणा मिळेल. असा आशावाद जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी उपस्थित सरपंच प्रकाश नाना पाटील, अरुण पाटील, युवा सेना पाळधी शहाराध्यक्ष आबा माळी. चंदन कळमकर. ज्ञानेश्वर पाटील.सोपाण पाटील.राजू पाटील.रामा माळी. वासू पाटील.शरद माळी.गोपी पाटील. गणेश माळी. समाधान वाघ.सचिन माळी. उपस्थित होते.