<
भडगाव- (प्रतिनिधी) – केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एकेरी भाषा वापरक्षल्याच्या निषेधार्थ शिवसैंनिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला.
शिवसेना पदाधिकार्यांनी निषेध व्यक्त करत भडगांव येथे २४ आंगस्ट रोजी तहसिल कार्यालयात निवासी नायब तहसिलदार रमेश देवकर , व भडगांव पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्याकडे निवेदन देवुन आपला रोश व्यक्त केला . निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी उप जिल्हाप्रमुख गणेश परदेशी , युवा जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील , तालुका प्रमुख विलास पाटील , विधानसभा क्षेत्रप्रमुख जे. के. पाटील , शहर प्रमुख योगेश गंजे , युवासेना तालुका प्रमुख रवीद्र पाटील , युवासेना शहर प्रमुख निलेश पाटील , वैद्यकिय आघाडीप्रमुख डाँ प्रमोद पाटील , सतोष महाजन , दीपक पाटील , मनोहर महाले , गोरख पाटील , पप्पु पाटील , पिटु मराठे , रावण भील , दुर्गेश वाघ , अनिस मनियार , चेतन पाटील उपस्थित होते.