Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात प्राण्यांच्या चाव्यांवर ६६२ जणांनी घेतले इंजेक्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राणी चावल्यावर घ्यावयाचे इंजेक्शनसाठी दररोज बाधित रुग्ण उपचार करायला येतात. जुलै महिन्यात ३८८ जणांनी तर ऑगस्ट महिन्यात २३ ऑगस्टपर्यंत २७४ जणांनी इंजेक्शन घेऊन उपचार घेतले. प्राण्यांमध्ये माणसांना सर्वाधिक चावे कुत्र्यांनी घेतले आहे.

रुग्णालयात ओपीडी वेळेत कक्ष क्रमांक १०५ मध्ये तर दुपारून आपत्कालीन विभागात हे इंजेक्शन दिले जाते. जुलै महिन्यात कुत्र्यांचे चाव्यामुळे ३६६ रुग्णांनी उपचार घेतले. यात २२३ पुरुष, ६१ महिला, ५३ लहान मुले, २९ लहान मुली अशांचा समावेश आहे. याशिवाय उंदीर चावल्यावर ५ पुरुष, १ मुलगा, मांजर चावल्यामुळे ५ पुरुष, ३ महिला, ३ लहान मुलं, घोडा चावला म्हणून १ पुरुष तर गाय चावली म्हणून २ पुरुष, १ महिला व १ लहान मुलाने उपचार घेतले आहे.

ऑगस्ट महिन्यात २३ दिवसात कुत्र्याच्या चाव्यावर २७० जणांनी उपचार घेतले. यात यात १६३ पुरुष, ५२ महिला, ४१ लहान मुले, १४ लहान मुली अशांचा समावेश आहे. याशिवाय उंदीर चावल्यावर २ पुरुष, मांजर चावल्यामुळे १ पुरुष, डुक्कर चावला म्हणून १ पुरुषाने उपचार घेतले आहे.

दरम्यान, भटक्या व पाळीव प्राण्यांपासून लहान मुलांना शक्यतोवर दूर ठेवा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांनी केले आहे. कोणताही प्राणी चावला तर उपचार घेण्यासाठी तातडीने रुग्णालयात यावे. कुत्रा चावला तर जखमेवर परस्पर मलमपट्टी करू नये.

वाहत्या पाण्याखाली जखम धुवावी. तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे इंजेक्शन घेण्यासाठी यावे. त्यानंतर दिलेल्या पुढील तारखांना इंजेक्शनचे उर्वरित डोस घ्यावेत असेही डॉ. गावित यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात २०० दिव्यांगांची तपासणी

Next Post

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे आ. रणजीत कांबळे विधान मंडळ समिती प्रमुख यांना निवेदन सादर

Next Post
महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे आ. रणजीत कांबळे विधान मंडळ समिती प्रमुख यांना निवेदन सादर

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे आ. रणजीत कांबळे विधान मंडळ समिती प्रमुख यांना निवेदन सादर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d