<
जळगाव – आज दिनाक 25/08/2021 रोजी मा. रणजीत कांबळे, आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.मा. मकुंदभाऊ सपकाळे प्रदेशअध्य्क्ष महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा यांनी जळगाव जिल्ह्यातील बाभोरी, तालुका जळगाव, तसेच कोसगाव तालुका यावल या गावातील अनुसूचित जातीच्या सरपंचाना गावातील ग्रा. पं. सदस्य गावातील विकास कामे करू देत नसल्यामुळे गावातील विकास खूंटला आहे.
तरी मागसवर्गीय अनुसूचित जाती-जमातीचे सरपंच असल्यामुळेच त्यांना जातीय त्वेषाने विरोध केला जात असून त्यांचे विरुद्ध कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले या प्रसंगी,सचिन बिराडे सरपंच बांभोरी, दिलीपभाऊ सपकाळे जिल्हाअध्यक्ष(रिक्शा यूनियन ) मा. सुरेश तायड़े जिल्हा उपाध्यक्ष, साहेबराव वानखेड़े युवाजिल्हा अध्य्क्ष, बापू निकम संदीप कोळी ग्रा. पं. सदस्य बांभोरी,आकाश सपकाळे, सुधाकर सपकाळे इ.उपस्थित होते.