<
जळगाव (जिमाका) दि. 26 – मन्याड मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून आज 26 ऑगस्ट रोजी पहाटे 4.30 वा. मन्याड मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 100 टक्के झाला असून प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्यावरून पुराचा विसर्ग सुरू झालेला आहे.
तरी मन्याड नदीच्या व गिरणा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी नदीत जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगून आपली काळजी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगांव व उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगांव यांनी केलेले आहे.