<
जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे अपंगाना घरकूल व ५℅निधी मिळणे बाबत आज दि.२६ रोजी जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना जागृत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की पंचायत समिती मधील अपंग बांधवांच्या न्यायासाठी जामनेर पंचायत समितीला वेळोवेळी निवेदन देऊन,उपोषणे करून अपंग बांधवाना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असता पंचायत समिती कडून आतापर्यंत कुठलाही लाभ मिळाला नाही.
याप्रकारचे न्याय जामनेर पंचायत समिती कडून मिळाले पाहीजे त्यासाठी अपंग धारकांच्या खालील माहीती पूर्ण कराव्या? १)सर्व अपंग बाधवांना घरकुल च्या ड यादीत समाविष्ट करून त्यांना कुठल्याही प्रकारची अट न मागता घरकूल मिळण्या बाबत. २)ग्रामपंचायतीच्या ओपन(खूल्या) जागेत जागा उपलब्ध करून द्यावी. ३)अपंगांना ५℅ निधी लवकरात लवकर देण्यात यावे व सर्व अपंग धारकांना जाँबकार्ड देण्यात यावे. ४)ग्रामपंचायत मध्ये रोजगार सेवक अपंग व्यक्ती असावा. ५)पंचायत समिती मध्ये बाधण्यात आलेले घरकूल डेमोखोलीत अपंगांना आठवड्यातून दोन दिवस बसण्यासाठी देण्यात यावी.
याप्रकारच्या मागण्या पंधरा दिवसात टपाल द्वारे मान्य न झाल्यास जागृत अपंग संघटने कडून आत्मदहन करण्याचा ईशारा करण्यात येईल. या सर्व बाबीस जामनेर पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील. याठिकाणी निवेदन देते वेळी जागृत अपंग संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ काशिनाथ सूरळकर,उपाध्यक्ष गणेश झिपरू साळूंखे,सदस्य कैलास विकास कोळी,मोहन सूरवाडे,जिलेश शिसोदे,युवराज मगरे,दरबार चव्हाण,अलियार पठाण, आशाबाई पाटील,प्रदीप पवार आदी उपस्थित होते.