Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात महिन्याभरात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून ११४ रुग्णांवर मोफत उपचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाविरहित रुग्णसेवा सुरु झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात एकूण ११४ रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात आले असून रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

गरीब व गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु झालेली आहे. या योजनेतून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनानेदेखील जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे. योजनेसाठीचे कार्यालय रुग्णालयाच्या आवारात दर्शनी भागात असून येथे डाटा एंट्री ऑपरेटर सह नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.

योजनेमधून २२ जुलै ते २६ ऑगस्टपर्यंत कोरोनाविरहित ११४ रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये वर्षभरात किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, महिलांच्या गर्भाशयाच्या समस्या, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा, लहान मुलांचे आजार, डेंग्यू, डायलिसिस आदी आजाराने ग्रस्त रुग्णांना तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनादेखील लाभ झाला आहे.

राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक), अन्नपूर्णा, अंत्योदय कार्ड कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु झाली आहे. यासाठी ओरिजनल आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीय बँकेचे पासबुक, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट या कागदपत्रांची आवश्यकता असते.

योजनेचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश रामानंद, सदस्य सचिव तथा उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी माधुरी पाटील, अभिषेक पाटील, संदीप माळी, तेजस वाघ हे रुग्णांसह नातेवाईकांना सहकार्य करून माहिती देत आहेत. ज्या रुग्णांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी रुग्णालयातील कार्यालयात अथवा अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव (८७६७३३७८१५) यांना संपर्क करावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

“ज्या रुग्णांना उपचार करण्यासाठी आर्थिक अडचण आहे, त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णालयातील उत्तम आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा उत्तम लाभ होत आहे.” – डॉ. जयप्रकाश रामानंद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अपंगाना घरकूल व ५℅ निधी मिळणे बाबत जामनेर गटविकास अधिकारी यांना जागृत अपंग सघटनेच्या वतीने निवेदन

Next Post

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

Next Post
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास 10 सप्टेंबरपर्यंत मुदत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo