Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा.सतेश्वर मोरे यांच्या साहित्याने तरुणांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे भान जागविले – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/08/2021
in लेख
Reading Time: 1 min read
प्रा.सतेश्वर मोरे यांच्या साहित्याने तरुणांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे भान जागविले – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

दिवंगत साहित्यिक प्रा. सतेश्वर मोरे यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून सांत्वन

अमरावती, दि. २१ : दिवंगत साहित्यिक सतेश्वर मोरे यांनी आपल्या साहित्यातून समता, न्याय, मानवता, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा हिरीरीने पुरस्कार करत आंबेडकरी साहित्याची चळवळ पुढे नेली व तरुणांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे भान जागविले. ते खऱ्या अर्थाने लढवय्ये व कृतीशील साहित्यिक होते. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना सदोदित प्रेरणा देत राहतील, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिवंगत प्रा. मोरे यांना आदरांजली वाहिली.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज दिवंगत मोरे यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दिवंगत मोरे यांच्या पत्नी श्रीमती प्रा सीमा मेश्राम -मोरे, तसेच आई, मुलगी व अन्य कुटुंबियांशी संवाद साधून पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी पालकमंत्र्यांनी प्रा. मोरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. सुदाम सोनोने, बाळासाहेब मेश्राम, प्रवीण मनोहर यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, दिवंगत प्रा. मोरे या कवितलेखनाबरोबरच नाटक, समीक्षा, वैचारिक लेखनही सातत्याने केले. लेखनाबरोबरच त्यांनी आंबेडकरी साहित्याची चळवळ पुढे जाण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. अनेक आंबेडकरी साहित्य संमेलने व विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांनी तरुण साहित्यिकांना   प्रोत्साहित केले. त्यांचे प्राध्यापक म्हणून संशोधकीय व अकॅडमिक कामही मोठे आहे. त्यांचे लेखन व विचार तरुणाई व पुढील पिढ्यांना अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देत राहील.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना संकटातही आधार बचतगटाचा

Next Post

कथाकथनास शालेय शिक्षण विभाग प्रोत्साहन देईल – ‘कथांची शक्ती’ कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आश्वासन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo