Sunday, July 6, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात 14 गावांनी पूर्ण केली 100 टक्के ई पीक पाहणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

ई पीक पाहणीत जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर;महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांची माहिती

जळगाव (जिमाका) दि. 29 – माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार, माझा पीकपेरा या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलमधून भरता यावा, याकरीता राज्य शासनाने 15 ऑगस्ट, 2021 पासून ई पीक पाहणी प्रकल्प सुरू केला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी यासाठी आवश्यक ते नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील तहसिलदार यांच्या अथक प्रयत्नामुळे सहा तालुक्यातील 14 गावामध्ये 100 टक्के ई पीक पाहणीचे काम पूर्ण झाले असून या 14 गावांचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

जळगांव जिल्हयात 15 ऑगस्टपासून खातेदाराने प्रत्यक्ष ई पीक पाहणी करण्यास सुरवात झाली असून तलाठी यांचे सक्रीय सहभागामुळे सुरवातीपासूनच जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. २८ ऑगस्टअखेर सर्व गावांमध्ये ई पीक पाहणी ॲप पोहचले असून आतापर्यंत जिल्ह्यातील 72 हजार 867 शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. तर 42 हजार 289 शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पीक पाहणी भरली आहे. या कामगिरीमुळे जळगांव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) शुभांगी भारदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शिंगायत, रामपूर येथील तलाठी -अजय गवते, टाकळी खु.- दिपाली महाजन, गंगापुरी- मीनाक्षी पडागळे, हिंगणे बु. – फिरोज खान, चोपडा तालुक्यातील मालापुर, सलीम तडवी, मोरचिडा- अमीन अरमान तडवी, मुळ्यवतार- अजय लोका पावरा, एरंडोल तालुक्यांतील हनुमंतखेडे, यावल तालुक्यातील चिंचोली- निखिल मिसाळ, वाघोदे- पी एन नेहते, वाघझिरा -टी सी बारेला, चाळीसगांव तालुक्यातील कोंगानगर- वैशाली केकान, विसापूर- वृषाली सोनवणे, धरणगाव तालुक्यातील निशाणे खु. बसवेश्वर मजगे यांनी विशेष परिश्रम करुन गावात 100% ई पीक पाहणी पूर्ण केली आहे. याबद्दल जिल्हाधिकारी यांनी या गावांचे व महसूल यंत्रणेचे कौतुक केले असून ई पिक पाहणी यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील इतर गावे देखील यापासून प्रेरणा घेऊन सहभाग नोंदवतील व ई पीक पेरा स्वतः भरतील. असा आशावादही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केल्याचे उपजिल्हाकारी (महसुल प्रशासन) श्रीमती भारदे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

जल साक्षरता अभियानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन;भू वैज्ञानिकांच्या चमुची जिल्ह्याभरात जनजागृती

Next Post

डॉ. अनघा चोपडे ठरल्या 300 Km BRM ब्रेवेट दी रन्डोन्नेउर इंटरनॅशनल इव्हेंट पुर्ण करणारी जळगावची पहिली महिला

Next Post
डॉ. अनघा चोपडे ठरल्या 300 Km BRM ब्रेवेट दी रन्डोन्नेउर इंटरनॅशनल इव्हेंट पुर्ण करणारी जळगावची पहिली महिला

डॉ. अनघा चोपडे ठरल्या 300 Km BRM ब्रेवेट दी रन्डोन्नेउर इंटरनॅशनल इव्हेंट पुर्ण करणारी जळगावची पहिली महिला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications