जळगांव(डॉ धर्मेश पालवे):-
गेल्या दहा वर्षचा इतिहास पाहिला तर जळगाव जिल्ह्यातील काही निवडक राजकीय घडामोडी समोर येतात ज्या घटनांमुळे जळगाव शहरातील व त्या मागोमाग महाराष्ट्रात सूर असणारे राजकीय वारे उलट सुलट प्रतिक्रिया च्या रुपात भरते आणत आहे असं चित्र आहे.
काही दिवसांपासून ईडी यंत्रणेने विविध पक्षाच्या राजकारणी लोकांच्या मागे ससेमिरा लावला आहे. तर मा गिरिषभाऊ महाजन यांनी आम्ही इडी लावली तुम्ही सीडी लावा असे प्रत्युत्तर दिले. आणि या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा महाराष्ट्र सह जळगाव जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मालमत्ता जप्ती ची कारवाई ही त्या घटनांमधील एक कारवाई होती हे आपण पाहिला आहे. यावरून केंद्र सरकार ईडी यंत्रणेला हाताशी धरून मनमानी कारभार करत आहेत, पोपट बनून पोलिसांनी राहू नये, या सह सूडाच्या भावनेपोटी ईडी कारवाई करत आहे असे आरोप विविध राज्यकर्त्यांनी केले आहे.
मात्र, ईडी आणि सीडी च्या या गोतावळ्यात आमचा जळगाव जिल्हा धुवून निघाला आहे हे मात्र निश्चित आहे. दोन दिगग्ज नेते, दोन वेगवेगळ्या मतप्रवाहाचे राजकारणी, आणि कधी कालचे एकाच पक्षाचे मोठे नेते जेव्हा आमने सामने एक मेकावर आरोप करतात तेव्हा जळगाव जिल्ह्यात समर्थकाकडून चर्चा व काही अंशी तोंडसुख घेतले जाते असे वातावरण होते.खर सांगायचं तर आमच्या जळगाव ला मनपा, जिल्हा परिषद,सारख्या संस्था चे खुप कामे बाकी आहेत. काही भ्रष्टाचार आहेत जे अजूनही समोर येत नाहीत.जिल्हातील भ्रष्टाचार राज्यभर गाजतात परंतु त्याकडे याच राज्यकर्त्याकडून दुर्लक्ष होत ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
शिक्षण क्षेत्रातील फी वाढ, शेतकरी वर्गाच्या समस्या, बेरोजगारांचा प्रश्न,आणि सामान्य जनतेच्या अशे कित्येक प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित आहेत,जिल्हा विकासाला हातभार पाहता याकडे एकाही राज्यकर्त्याच भाषण, आंदोलन, किंवा साधा विरोध किंवा समर्थन आम्हाला दिसत नाही. का असेल अशी अवस्था जळगावकरांची. ईडी च्या आणि सिडीच्या गप्पा मारून या सर्व समस्या सुटतील का? नवीन नवीन आरोप करत जनतेला वेडे ठरवलं जात आहे का? की ,पुढील निवडणुकीत आपलं पारडं जड करण्यासाठीची ही खेळी आहे? असे प्रश्न समोर आ करून उभे आहेत.असो पण ,ईडी आणि सीडी ने काही साध्य होवो अथवा न होवो परंतु या पोलखोल मुळे जळगाव करांच्या वाट्याला काय येईल कोणास ठाऊक. गेल्या 10 वर्षीच्या आधी जी विकासाची घडी होती ती पुन्हा तशीच बसावी अशी जिल्ह्यातून आशा व्यक्त होत आहे.यावरून अस म्हणणं वावग ठरणार नाही की; नको ईडी नको ती सीडी आम्हाला हवी आहे आमच्या जिल्ह्याची पूर्वीची घडी..
सदर लेख डॉ धर्मेश पालवे जळगाव यांनी शब्दबद्ध केला असून ते राजकीय लेखन करतात.