Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव(जिमाका)- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्ह्यास वार्षिक कृती आराखडा मंजुर झाला असून सदर योजनेतंर्गत नमूद केलेल्या घटकांकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अळिंबी उत्पादन केंद्रासाठी अनुदान मर्यादा 8 लाख रुप्ये, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (आंबा पिकासाठी) रुपये 20 रुपये, सामुहिक शेततळे 24x24x4 मी. आकारमानासाठी 1 लाख 75 हजार रुपये, 34x34x4.7 मी. आकारमानासाठी 3 लाख 39 हजार रुपये, शेततळे अस्तरीकरणासाठी जास्तीत जास्त 75 हजार रुपये, संरक्षित शेती अंतर्गत हरितगृह व शेडनेटगृहासाठी मॉडेलनिहाय मंजुर खर्च मापदंडानुसार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के (जे कमी असेल ते), प्लॉस्टिक मल्चिंग 16 हजार रुपये, (जास्तीत जास्त 2.00 हेक्टर पर्यंत), टॅक्टर 20 अश्वशक्तीपर्यंत सर्वसाधारण प्रवर्गातील महाभुधारक लाभार्थ्यासाठी 75 हजार रुपये व सर्वसाधारण प्रवर्गातील अल्पभुधारक, अनु. जाती, अनु. जमाती, महिला शेतकरी यांना 1 लाख रुपये, शितखोली ग्राह्य भांडवली खर्चाच्या 35 टक्के रुपये 5 लाख 25 हजार रुपये, प्राथमिक प्रक्रिया केंद्र ग्राह्य भांडवली खर्चाच्या 40 टक्के रुपये 10 लाख रुपये, कांदाचाळ उभारणीसाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये 87 हजार 500 रुपये, मधुमक्षिका वसाहत व संच वाटपासाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 40 टक्के रुपये 40 हजार , स्थाई/ फिरते/विक्री केंद्र शित चेंबरच्या सुविधेसह यासाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये 15 हजार रुपये, पॅक हाऊससाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये 2 लाख, ड्रॅगन फ्रुट, अंजीर व किवी लागवडीसाठी प्रति हेक्टर रुपये 96 हजार रुपये याप्रमाणे अनुदान देय राहील. शेतकरी बांधवांनी या घटकांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून अर्ज सादर करावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधूनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डाशी संलग्न करणे आवश्यक राहील. पोर्टलवर प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरीत अर्ज सादर करावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

आजच्या मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय

Next Post

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी :जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या दूध खरेदी दरात वाढ

Next Post
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी :जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या दूध खरेदी दरात वाढ

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी :जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या दूध खरेदी दरात वाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo