<
जळगांव(प्रतिनिधी)- डॉ. उल्हास पाटील होमीयोपॅथीक महाविद्यालय आणि रूग्णालय, जळगांव यांच्या तर्फे आयुष मोहीमेअंतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात २ सप्टेंबर रोजी आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.उल्हास पाटील होमियोपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य डॉ.डी.बी.पाटील हे उपस्थीत होते. सर्वप्रथम उपस्थीत मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले.
डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, प्रा.पी.एस.देवरे, डॉ.के.पी.ढाके, प्रा.यशोदिप पवार, प्रा.आरती व्यास, प्रा.शरद पाटील, प्रा.परीस यादव, प्रा.राम पाटील, प्रा.शितल पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये आयुष मंत्रालय अंतर्गत ७५ वा आजादी का अमृत महोत्सव विषयी माहीती देतांना होमियोपॅथी चे कोरोना काळातील योगदान कशाप्रकारे अनन्य साधारण आहे ते सांगितले तसेच योगाभ्यास, ध्यानसाधना, आयुर्वेद, सकस आहार याचा योग साधुन कोरोना पासुन दुर राहण्याचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांनी आपल्या मनोगतीय भाषणामध्ये आयुष अंतर्गत चालणार्या विविध कार्यप्रणालीची माहीती प्रत्येकाने घ्यावी व स्वत:ला निरोगी ठेवावे असे आव्हान केले तसेच कोरोना काळातील वैद्यकीय कर्मचार्याच्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वैशाली राणे यांनी तर आभार प्रा.मयूरी देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास डॉ.उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व कर्मचारी उपस्थीत होते.