<
जळगाव(जिमाका)- जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती व फळ पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिक विमा़ काढलेला आहे. त्यांनी 72 तासांच्या आत झालेल्या नुकसानीची प्रथम सुचना विमा कंपनीस द्यावी. असे आवाहन तंत्र अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.जिल्ह्यातील काही भागात 30 व 31 ऑगस्ट, 2021 रोजी अतिवृष्टी झाली असून यामुळे शेती व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत भारती ॲक्सा विमा कंपनीस टोल फ्री क्रमांक 18001037712 द्वारे द्यावयाची आहे. टोल फ्री क्रमांकाव्दारे सुचना देता न आल्यास कंपनीचे कार्यालयास कंपनीचे ईमेलवर अथवा आपले तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सुचना पत्र सादर करावे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.