Tuesday, July 15, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी महसुल, कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे मोठया जल्लोषात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/09/2021
in राजकारण
Reading Time: 1 min read
माजी महसुल, कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे मोठया जल्लोषात साजरा


मुक्ताईनगरच्या कानाकोपऱ्यात एकनाथराव खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्यानी मुक्ताईनगर सजले


मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सर्वांचे लाडके नेते नाथाभाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी सहा वाजेपासूनच कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांची नागरिकांची रीघ लागली होती. ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस कार्यकर्ते व पदाधिकारी ठिकठिकाणी साजरा करत होते. यावेळी मुक्ताईनगर येथील फार्म हाऊस वर दिवसभर थांबून एकनाथराव खडसे यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हतनुर धरणाच्या जलाशयातून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याचा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन कळ दाबून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जयंतराव पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरस द्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केले

हतनूर जलाशयातून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याच्या कामाचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन करण्यात आले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरस द्वारे संबोधित करताना जयंतराव पाटील म्हणाले जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी आग्रह धरून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन योजना आणि इतर प्रकल्पांची आढावा बैठक घ्यायला लावली त्या बैठकीत रोहिणी खडसे खेवलकर यांनी हतनुर जलाशयातून ओझरखेडा धरणात पाणी टाकण्याची आग्रही मागणी लावून धरली त्यानुसार अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तातडीने तांत्रिक अडचणी दुर करण्यास सांगितल्या.

पुढे बोलतांना ना.जयंत पाटील म्हणाले की, आज रोहिणीताई खडसे यांच्या आग्रहाने मोटार ,विद्युत पुरवठ्याच्या तांत्रिक अडचणी सोडवून एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हतनुर जलाशयातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात येत आहे. यानंतर दरवर्षी उन्हाळ्यात सर्व मोटार विद्युत पुरवठा याच्या चाचण्या घेऊन पावसाळ्यात सुरुवातलाच ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात येईल. एकनाथराव खडसे हे जलसंपदामंत्री असताना त्यांनी संपूर्ण खान्देशात विविध प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली एकनाथराव खडसे यांनी पाठपुरावा करून त्यातील बहुतांशी प्रकल्प पुर्ण केले गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत आम्ही जळगाव जिल्हयातील सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला यातील बहुतांशी प्रकल्पांचे काम जवळपास पूर्णत्वास येत आहे त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी एकनाथराव खडसे, रोहिणीताई खडसे नेहमी आग्रही असतात टप्प्याटप्प्यात या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून येत्या दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न राहील

मागील आघाडी सरकारच्या काळात एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने ओझरखेडा धरणाची उंची वाढविण्यात आली या धरणाच्या जलाशायतील पाणी मुख्यत्वे दिपनगर औष्णिक प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले होते त्यावेळी एकनाथराव खडसे यांनी आग्रह धरून ओझरखेडा धरणातील ५० टक्के पाणी ओझरखेडा धरण्याच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी देण्यात यावे अशी मागणी लावून धरली होती त्यानुसार ओझरखेडा धरण्याच्या खालील गावातील शेतकऱ्यांना ओझरखेडा धरणातून बंदिस्त पाईप लाईन द्वारे पाणी उपसा करण्यासाठी परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. एकनाथराव खडसे यांना मी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो व आपले सर्वांचे प्रेम असेच एकनाथराव खडसे यांच्यावर कायम ठेवा असे ना.जयंत पाटील यांनी संबोधित करताना कार्यकर्त्यांना आवाहन केले.

यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, महानगरअध्यक्ष अभिषेक पाटील,कल्पना पाटील, मंगला पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, सावदा नगराध्यक्षा अनिता येवले , प स सभापती सुवर्णा साळुंखे, किशोर गायकवाड,युवक जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ,सरचिटणीस ईश्वर रहाणे,सोपान पाटील, अरविंद मानकरी,रमेश नागराज पाटील, राजेश वानखेडे, पंकज येवले, उमेश नेमाडे,सय्यद अजगर,अजय भारंबे,गोटू सेठ महाजन, निळकंठ चौधरी,राजु माळी,यु डी पाटील, नामदेव भड, निलेश पाटील, प्रदिप साळुंखे, विकास पाटील,दशरथ कांडेलकर, विलास धायडे,रामभाऊ पाटील , अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, अशोक पाटील,समाधान कार्ले, सुधाकर पाटील ,पवनराजे पाटील, दिपक पाटील, उद्धव पाटील, रामदास पाटील, मधुकर राणे, प्रदिप बडगुजर, शाहिद शेख, विशाल महाराज खोले,शिवराज पाटील, अनिल पाटील, अनिल वराडे, भरत अप्पा पाटील, रवींद्र खेवलकर, विजय चौधरी, कल्पेश शर्मा, दीपक वाणी, निलेश पाटील ,आबा भाऊ पाटील कैलास चौधरी,दिपक कोळी,गणेश तराळ,कैलास पाटील, अतुल पाटील, लीलाधर पाटील, विनोद काटे,सुनिल काटे,नंदकिशोर हिरोळे, चंद्रकांत बढे, नारायण चौधरी,उमेश राणे,सुधाकर जावळे, दिपक मराठे,राजेंद्र चौधरी व इतर मान्यवरांच्या हस्ते ओझरखेडा धरण येथे जलपुजन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर तर्फे परिवर्तन चौकात एकनाथराव खडसे यांची लाडूतुला करण्यात आली. यावेळी राजू माळी,नगरसेवक बापू ससाणे, अनिल पाटील, प्रवीण पाटील, आसिफ बागवान,मस्तान कुरेशी, शकील सर ,आमीन खान, अशोक नाईक,योगेश काळे संजय कपले, गजानन पठार, संजय माळी, संजय कोळी,रउफ खान, निलेश बोराखडे, मनोज तळेले व इतर पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनंतर खडसे फार्म हाऊस येथे पुणे येथील गोल्डमॅन प्रशांत सपकाळ यांनी आणलेला ५९ किलो वजनाचा केक एकनाथराव खडसे यांच्या हस्ते कापण्यात आला तसेच संजय कपले, योगेश काळे यांनी एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे याचे फोटो असलेल्या कापडी पिशव्यांचे अनावरण करून वाटप करण्यात आले. यावेळी रोहिणी खडसे, माजी आमदार नरेंद्र पाडवी, गुरुमुख जगवाणी,भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, सुनील नेवे ,तुषार सनासे ,निशांत सपकाळ, अखिल चौधरी, अजय बढे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दिवसभरात एकनाथराव खडसे यांना आ संजय सावकारे, जि प उपाध्यक्ष लालचंद पाटील,माजी आमदार अरुण पाटील, दिलीप वाघ, जिल्हा बँक संचालक संजय पवार, लेवा कुटुंब नायक रमेश विठू पाटील,डॉ सुरेश पाटील, डॉ अरविंद कोलते, दिलीप नाफडे इतर मान्यवरांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. खडसे फार्म हाऊस येथे दिवसभर राज्यभरातून आलेले कार्यकर्ते, खडसे समर्थक यांची गर्दी बघायला मिळाली. यावरून एकनाथराव खडसे यांना असलेला जनाधार तसुभर ही कमी झालेला नसल्याचे दिसून आले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर तर्फे एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम तालुका क्रिडा संकुल क्रीडांगण सालबर्डी फाटा येथे आयोजित केला आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री ना राजेंद्र शिंगणे उपस्थित राहतील असे आयोजकांनी कळवले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मतदार जागृतीसाठी गणेश मंडळांसोबत उपक्रमांचे आयोजन; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

Next Post

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

लोहारा येथे पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई… आजही होतोय टँकरने गावाला पाणीपुरवठा

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications