Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा; विधायक कार्यावर भर देण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा; विधायक कार्यावर भर देण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

जळगाव(जिमाका)- कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी कोरोना लसीकरण शिबीर, मतदार नोंदणीबाबत जनजागृती सारखे विधायक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव 2021 ची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, महापालिकेचे उपायुक्त प्रविण पाटील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सचिन नारळे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. राऊत म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबत मार्गदर्शक सुचनाही निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांची माहिती यंत्रणेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करुन द्यावी. त्याचबरोबर या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रमाबरोबर लसीकरण शिबिराचे आयोजन करावे. त्याचबरोबर उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा या उपक्रमातंर्गत मतदार नोंदणी, आजादी का अमृत महोत्सव यासारखे उपक्रम राबवावे. त्याचबरोबर श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत. पूजा व आरती करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळाकरीता मुर्ती 4 फुट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी. श्रीगणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, वेबसाईट, फेसबुक, केबलद्वारे उपलब्ध करुन द्यावी. गणपती मंडपामध्ये निर्जतुकीकरणाच्या व्यवस्थेसह शरिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळले जाऊन यंदाचा गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या पध्दतीने व भक्तीभावात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यंदाचा गणेशोत्सव हा आनंदोत्सव म्हणून साजरा करुया – डॉ. मुंढे

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे

शासनाच्या मार्गदशक सुचनांनुसार सार्वजनिक मंडळानी नियमांचे पालन करावे. गणेश मंडळाना कमीत कमी कागदपत्रांमध्ये आवश्यक ती परवानगी देण्यात येईल यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात येऊन गणेश मंडळांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. असे सांगून डॉ मुंढे म्हणाले की, यावर्षीचा गणेशोत्सव हा भक्तीमय वातावरणात आनंदोत्सव म्हणून साजरा करुया. त्याचबरोबर जिल्ह्यातील वाद्यवृंद पथकांना त्यांचे कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यासाठी शहरातील मोकळ्या जागेत त्यांचे कार्यक्रम घेऊन त्याचे लाईव्ह सादरीकरणाबाबत विचार करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक डॉ मुंढे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सचिन नारळे यांनी मंडळाची भूमिका, कार्यपध्दती व स्थापना आणि विर्सजनाबाबतची भूमिका विशद करुन गणेश मंडळांच्या ठिकाणी ज्यांना रोजगार पाहिजे त्यांची नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व स्वच्छता, वीजेच्या तारांजवळील झाडांच्या फांदा काढणे यासारख्या विधायक सूचना मांडल्या. बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती सर्व यंत्रणांना दिली.

या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंधा (भापेसे), प्रांताधिकारी प्रसाद मते, डॉ विक्रम बांदल, विनय गोसावी, यांचेसह महापालिका, वीज वितरण कंपनी व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पर्यावरण पुरक गणेशमुर्ती कार्यशाळा उत्साहात; भारत विकास परिषद, समर्पण संस्था व पर्यावरण शाळेचा उपक्रम

Next Post

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढला जाईल -मुख्यमंत्री

Next Post
घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढला जाईल -मुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d