<
अमळनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील चौबारी येथे ३५ भिल व पारधी समाजाच्या पात्र लाभार्थ्यांना खावटी किट वाटप करण्यात आले. यात भोरटेक येथील ५ लाभार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी सरपंच उषाबाई भिल, उपसरपंच विश्वास वाघू पाटील, सदस्य विजय पाटील, रवींद्र मोरे, अमोल राजपूत, संदिप राजपूत आदी उपस्थित होते. या खावटी किटमध्ये साखर, तेल, हरभरा, चवळी, मटकी, वटाणा, तूरडाळ, उडीद डाळ, गरम मसाला, मीठ, चहा पावडर, मिरची पावडर या वस्तूंचा समावेश आहे.
अडचणीच्या काळात आदिवासी विभागातर्फे खावटीच्या रूपाने मदत मिळाल्याने अनेकांच्या संसारास हातभार लागला आहे. मात्र उर्वरित पात्र काही लाभार्थ्यांची नावे यादीत न आल्याने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांनी वंचित लाभार्थ्यांना लाभ द्यावा. अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता रवींद्र मोरे यांनी तसेच शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील यांनी केली आहे. खावटी अनुदान किटच्या वाटपासाठी ताळेपुरा आश्रमशाळेचे शिक्षक भूषण भदाणे, विकास पाटील, पिंगळवाळे आश्रम शाळेचे शिक्षक के.के. शिंदे, जयश्री वराळे, पुष्पा जाधव, पूनम जाधव, भरत कोळी, मदन पाटील, गुरुदास लांडगे आदिंनी परिश्रम घेतले.