<
महाराष्ट्र विशेष – विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने प्रचाराला सुरवातही केली आहे. भाजप शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या चार पक्षांमध्ये मुख्य लढत असणार आहे. तर वंचित आघाडी, मनसे यांची भूमिका निर्णयक ठरणार आहे. तर आता भीम आर्मीने देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. जमल तर महाघाडी सोबत जाऊ, नाही तर स्वतंत्र लढून भीम आर्मीची ताकद दाखवून देऊ अशी माहिती भीम आर्मीचे नेते दत्ता पोळ यांनी दिली.
याबाबत ते म्हणाले की, संविधान विरोधी सरकारला हटविण्यासाठी समविचारी पक्ष, राजकीय संघटनानी एकत्र यावे. महाआघाडी झाल्यास भीम आर्मीला पुण्यातील कॅंटोन्मेंटसह परभणी, अमरावती आणि नवी मुंबई येथून पाच जागा मिळाव्यात. महाआघाडी झाली नाही, तर राज्यातील अनेक मतदारसंघात आमची ताकद चांगली असून, तेथे उमेदवार उभे केले जाणार आहे. निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर तयारी करण्यात येणार आहे.