<
नाशिक : जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त बुधवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी रेड क्रॉस येथे अस्थिरोग निदान, हाडांचा ठिसूळपणा (अस्थिघनता ) तपासणी व कोविड नंतर घ्यायच्या फिजिओथेरपी बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी नाशिक शाखा, मविप्र चे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट वूमेन्स सेल,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शिबिरात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रशांत भुतडा यांचे मार्गदर्शन लाभेल.
शिवाय रुग्णांचा हाडांचा ठिसूळपणा तपासणी, कोविड नंतर होणाऱ्या विविध त्रासांवर उपयुक्त फिजिओथेरपी बाबत मार्गदर्शन मिळेल. तसेच शिबिरात सहभागी रुग्णांना रेडक्रॉस फिजिओथेरपी सेन्टर मध्ये सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत.
रेड क्रॉस सोसायटी येथे सकाळी १० ते १२.३० होणार या शिबिरात रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मेजर पी. एम. भगत, सचिव, नाशिक रेडक्रॉस, डॉ. प्रतिभा औंधकर वैद्यकीय अधिकारी,रेडक्रॉस, फिजिओथेरपिस्ट डॉ दीप्ती वाधवा देवरे, डॉ.पक्षा कांबळे, डॉ .क्षितिज कौशिक , डॉ.दीप देवधर, डॉ.सूरज मेंगाणे आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२५३-२५०४९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.