<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शन करण्यात आले असून जिल्हाधिकारी जळगाव यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
नागपूर मधील आंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन नागपूर महापालिकेने पाडून उध्वस्थ केले. या कृतीचा आम्ही तीव्र निषेध करीत असून उध्वस्थ केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवनाचे त्वरीत पुनःनिर्माण करण्यात यावे. अनुसुचीत जाती-अनुसुचीत जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात राज्य शासनाने काढलेला ७ मे चा जी.आर. तातडीने रद्द करण्यात यावा. नाशिक येथील ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देऊन दादासाहेब गायकवाड यांचा सन्मान करण्यात यावा. गॅस, पेट्रोल, डिझेल इ. इंधनदर वाढीचा तीव्र धीक्कार करीत असून भाववाढ त्वरीत थांबवण्यात यावी. जळगाव जिल्ह्यामध्ये आरक्षीत जागेवर निवडून आलेल्या सरपंच यांना गावातील विरोधी लोक विकासकामे करण्यास सातत्याने अडचणी आणुन विकास कामात अडथडे आणून काम करणे कठीण करीत अशा गावातील विरोधकांवर कारवाई करण्यात यावी. उदा. धरणगाव तालुक्यातील बांभोरी, यावल तालूक्यातील कोसगाव येथे कमालीचा त्रास सरपंच यांना दिला जात आहे. तेव्हा कठोर कारवाई करावी. महात्मा फूले आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाला निधी उपलब्ध करून द्यावा. ओ.बी.सी.चे आरक्षण जाहीर होई पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणूका थांबविण्यात यावा आदी मागण्या पूर्ण करन्यासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा जळगाव तर्फे जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देते वेळी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे भारत ससाणे, रमेश सोनवणे, दिलीप सपकाळे, अमोल कोल्हे, चंदन बिऱ्हाडे, प्रा.प्रीतीलाल पवार, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, सचिन बिऱ्हाडे, जगदीश सपकाळे, हरीचंद्र सोनवणे, ऍड.अभिजित रंधे, डॉ.धर्मेश पालवे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात हजर होते.