Sunday, July 20, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन हिल्सवर प्रातिनिधीक पोळा साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जैन हिल्सवर प्रातिनिधीक पोळा साजरा

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत जैन हिल्स येथे पोळा साजरा करण्यात आला, पूजन करताना कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या पत्नी सौ. शोभना जैन

जळगाव दि. 6 (प्रतिनिधी) – ‘‘शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच माझा सर्वोच्च पुरस्कार!’’ मानणाऱ्या श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी जैन हिल्सवर भूमिपुत्र आणि सहकाऱ्यांसह पोळा साजरा करण्याची प्रथा सुरू केली. कोरोना पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे शासकीय नियम पाळून प्रातिनिधीक स्वरूपाचा छोटेखानी पोळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भूमिपुत्रांशी बांधिलकी असणाऱ्या जैन इरिगेशनतर्फे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सौ. ज्योती जैन तसेच कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व सौ. शोभना जैन यांनी पोळ्याच्या सोहळ्यावेळी तेथेच मांडलेल्या सप्तधान्यासह बैल जोड्यांचे विधीवत पूजन करुन बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरविला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सौ. ज्योती जैन व सौ. शोभना जैन यांच्या हस्ते पाच सालदार गडींना सपत्नीक भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. जैन इरिगेशनच्या कृषी विभागात पन्नास सालदार गडी कार्यरत आहेत.

प्रस्तुत प्रातिनिधीक पूजनानंतर जैन हिल्स टॉप, भाऊंची सृष्टी, जैन डिव्हाईन पार्क, जैन व्हॅली व्यूव्ह, जैन लेक व्यूव्ह, टिश्यूकल्चर पार्क, टाकरखेडा अशा विविध स्थळी शेतीनिहाय विभागात स्वतंत्रपणे पोळा साजरा करण्यात आला. त्या-त्या विभागाच्या प्रमुखांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

सुमारे २५ बैल जोड्यांना सजवून त्यांची भाऊंच्या समाधी स्थळापर्यंत (श्रद्धाज्योत) साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. श्रद्धेय मोठ्याभाऊंना नमन करणारा वृषभराज नम्रतेचं आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. पोळ्याचे तोरणही लावण्यात आले. यावेळी जैन रेसिडेन्सी पार्क विभागाचे सालदार गडी भगवान साबळे यांच्या बैलाने पोळा फोडला. आरोही जैन, अन्मय जैन, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, संजय सोनजे, अजय काळे, पी. ए. पाटील, रवी कमोद, प्रसाद साखरे व सहकारी तसेच शेती विभागातील जैन हिल्स येथे रहिवास असलेल्या सालदार सहकाऱ्यांच्या परिवारातील सदस्यही आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण सुरक्षितता बाळगून उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

प्रभाकर सिनकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Next Post
प्रभाकर सिनकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

प्रभाकर सिनकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications