<
जळगांव(चेतन निंबोळकर)- नुकत्याच पनवेल येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्यात. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तर्फे धरणगाव येथील कुस्ती पटू सहभागी झाले होते. या कुस्ती स्पर्धेत 2 गोल्ड मेडल धरणगाव मधील महेश रमेश वाघ 55kg सौरभ राजेंद्र पवार 57k गटात तसेच शितांशू शिवाजी चौधरी 38kg, दीपक रावसाहेब खैरनार51k, चैतन जिजाबराव माळी 63kg गटात सिल्व्हर मेडल मिळाले.
जळगाव जिल्हा स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष व झोनल इंचार्ज दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी व कुस्ती कोच संदीप कंखरे यांच्या मार्गदर्शनखाली सहभागी झाले होते. राज्यस्तरीय स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन कुस्ती स्पर्धेत पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याने सुवर्णपदक जिंकले आहे. जळगाव जिल्ह्यातून या स्पर्धेत 8 खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील 5 कुस्ती पटू नी मेडल जिंकले आहे. यानंतर 17, 18 व 19 स्पटेंबर ला रोहतक हरियाणा येथे नॅशनल स्पर्धा होणार आहे असे जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांनी सांगितले. विजयी कुस्ती खेळाडूंचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.