<
जळगाव(प्रतिनिधी)- गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवार, ७ सप्टेंबरपासून मेडिकल एज्युकेशन युनिटद्वारे तीन दिवसीय रिव्हाइज्ड बेसिक कोर्स कार्यशाळेला प्रारंभ झाला. यात महाविद्यालयातील ३० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला आहे.डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील एमईटी हॉलमध्ये मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून कार्यशाळेस सुरुवात झाली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.उल्हास पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे डॉ.संदिप कडु याची विशेष उपस्थीती होती.
व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, मेडिकल एज्युकेशन युनिटचे प्रमुख डॉ.सुयोग चोपडे हे उपस्थीत होते. दिपप्रज्वलन करुन कार्यशाळेला सुरुवात झाली. अध्यक्षस्थानावरुन डॉ.उल्हास पाटील यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांची माहिती दिली. मेडिकल एज्युकेशनमधील नविन बदलांची माहिती प्राध्यापकांना देणे हा कार्यशाळेमागील उद्देश्य आहे. यात ३० प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांना डॉ.सुयोग चोपडे, डॉ.जयंत देशमुख, डॉ.माया आर्विकर, डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.अमृत महाजन, डॉ.कैलास वाघ, डॉ.राहूल भावसार, डॉ.अनिता फेटिंग, डॉ.नेहा महाजन, डॉ.रंजना शिंगणे, डॉ.देवेंद्र चौधरी आदि मार्गदर्शन करत आहे. ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान ९ ते ५ या वेळेत होत असलेली ही कार्यशाळा २१ सत्रांमध्ये विभागली गेली आहे.
गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी कार्यशाळेचा समारोप होणार असून यावेळी सहभागी प्राध्यापकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग प्रयत्नशील आहे.