<
जळगाव(चेतन निंबोळकर)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमेस माल्यार्पण करून वंदन केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. चेतन भंगाळे, डॉ. खुशाली राठोड, दिलीप मोराणकर, एस. बी. दुसाने, जे. एस. गवळी, राजेंद्र धाकड, राजेंद्र वैद्य, संजय पाथरूट, ज्ञानेश्वर डहाके, ज्ञानेश्वर राठोड, महेश गुंडाळे, उमेश टेकाळे, दीपाली पाटील, वैशाली रोडे, अनिल कापुरे, गोपाळ बहुरे, मंगेश जोशी, राजू अहिरे, व्ही. सी. शिंदे, संजय शेळके, लीलाधर कोळी, अजय जाधव आदी उपस्थित होते.