<
जळगांव(चेतन निंबोळकर)- “आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत जळगाव शहर व परिसरातील घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक, विविध खाजगी कंपनी मध्ये काम करणारे रोजंदार यांच्या एकूण ००० पाल्यांना केशवस्मृती प्रतिष्ठान द्वारा वही वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे अनेक जणांचे रोजगार गेले आहे याची सर्वात मोठी झळ घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक, विविध खाजगी कंपनी मध्ये काम करणारे रोजंदार यांना बसली आहे. त्यातच पाल्यांच्या ऑंनलाईन शाळा सुरु झाल्या आहेत एकीकडे रोजगार उपलब्ध नाहीत व त्यातच पाल्यांचा शैक्षणिक साहित्याचा खर्च या समस्या उद्भवल्या. त्यावर पर्याय म्हणून केशवस्मृती प्रतिष्ठान च्या वतीने “आम्हालाही शिकायचे आहे” या उपक्रमांतर्गत जळगाव शहरातील कांचन नगर, शनिपेठ, पिंप्राळा, भागातील २५३ विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप प्रत्यक्ष त्या त्या भागात जाऊन करण्यात आले, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य तर मिळालेच आहे सोबत शिक्षणाचा आर्थिक भार देखील कमी होण्यास मदत झाली.
कांचन नगर व शनिपेठ येथे झालेल्या कार्यक्रमास जळगाव जनता बँकेच्या संचालिका सावित्री साळुंखे, रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सचे अध्यक्ष निरज अग्रवाल यांच्यासह धनराज कासट, सागर मुंदडा, केशवस्मृतीचे प्रशासकीय अधिकारी सागर येवले यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विश्वजीत सपकाळे, प्रदिप पाटील, कु. भाग्यश्री कोळी, रोहन सोनगडा, प्रसाद बागले, राकेश भोई यांनी परिश्रम घेतले.