<
जळगांव(प्रतिनिधी)- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एस.एस.मणियार महाविद्यालयास आयोगाकडून नॅशनल व्होकेशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क या संकल्पने अंतर्गत कौशल्य विकासासंबधीत बी.व्होक. या अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे. कायदा या विषयातील अद्यावत कौशल्य विकास प्रशिक्षण या अभ्याक्रमात देण्यात येणार आहे.
सदर अभ्याक्रमाचे वैशिष्ट्य:- 1)तीन वर्षीय अभ्यासक्रमास मल्टी पॉईंट एन्ट्री आणि मल्टी पॉईंट एक्सिट आहेत. एक वर्ष पूर्ण केल्यावर डिप्लोमा, दोन वर्ष पूर्ण केल्यावर ॲडव्हान्स डिप्लोमा आणि तीन वर्ष पूर्ण केल्यावर बॅचलर इन व्होकेशन ही पदवी मिळेल. 2)अभ्यासक्रमात प्रत्यक्ष काम करण्याची संधी चार्टड अकाउंट फर्म, लीगल प्रोसेसिंग फर्म, कंपनी सेक्रेटरी फर्म, लीगल आऊट सोर्सिंग फर्म आदी ठिकाणी उपलब्ध करुन दिली जाईल. 80% प्रात्यक्षिक आणि 20% थेअरी या सूत्रावर अभ्यासक्रमाची रचना आहे.
या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी:- 1)आपली स्वतःची कंपनी लॉ या विषयात कार्य करणारी संस्था विद्यार्थी चालवू शकतो.जीएसटी टॅक्सेशन, लेबर लॉ इम्पलायन्स या उद्योगाना मदत करणारी करणारी फर्म देखील चालवू शकतात. 2)चार्टड अकाउंट फर्म मध्ये लेबर लॉ, कार्पोरेट लॉ या संबंधी काम करु शकतात. 3)कंपनी सेक्रेटरी फर्म मध्ये कंपनी कायदा, कार्पोरेट कायदा गव्हरनन्स या संबंधी काम करु शकतात. 4) वरिष्ठ वकिलांची कार्यालय, नामांकित लॉ मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी
वरील सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रवेश पात्रता :- कोणत्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, बारावी, किमान कौशल्य तसेच कुठलीही मर्यादा नाही. गृहिणी, उद्योजक, व्यवसायिक, खाजगी क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, वाणिज्य क्षेत्र आदी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना स्वयं रोजगार, रोजगार मिळवण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी व या संबंधी अधीक माहितीसाठी प्रा. नितीन मतकरी 9326778329 या क्रमांकावर संपर्क साधावा.