<
जळगाव – (प्रतिनिधी) – आज दिनांक ८/९/२०२१ रोजी रात्री २ वाजता मण्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली असल्याने धरणातून अंदाजे ६० ते ७० हजार क्युसेक विसर्ग चालू आहे.
तरी मन्याड व गिरणा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, धरणाला कोणताही धोका नाही, धरण सुरक्षित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन हेमंत व्ही. पाटील,
उप विभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगांव यांनी केले आहे.