<
जळगाव(धर्मेश पालवे)- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, मुक्ताईनगर, एरंडोल, भुसावळ आणि पारोळा व पाचोरा या तालुक्यांना मागील आठवड्यात अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. वादळ पाऊस वाऱ्यासह या तालुक्यातील गावे पुराच्या पाण्यामुळे भितीखाली वावरत आहेत.या गावांमध्ये अनेक घरांची पडझड झाली असून लहान-मोठ्या जनावराचे मृत्यु झाला आहे.
दुकानांमध्ये पाणी घुसून मालाचे नुकसान झाले आहे. चाळीसगाव शहरातील सखल भागातील अंदाजे शंभरच्या वर घरांमध्ये पाणी शिरले होते. ही नैसर्गिक आपत्ती आहे, याचा कांगावा करत आपली जबाबदारी झटकून तोंडसुख घेणारे आपत्ती व्यवस्थापन विभाग व राजकीय मंडळी मागे हटताना आपण सर्वांनी पाहिले. काल दिवसभर जामनेर तालुक्यात ही चाळीसगाव मध्ये पाऊस झाला तसा जोरदार पाऊस झाला. जामनेर मधील जणजीवन विस्कळीत झालं. अनेक गावांचा संपर्क तुटून भीती सदृश्य वातावरणाला जामनेर व शेजारील गावांना सामोरे जावे लागले आहे. आणि आज ही तेथे भीतीखाली लोकं वावरत आहेत. जनावरे, मानवी कुटंब यांना जिवित हानी झाली आहे.या शहरात ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे त्या परिवाराचे पुर्नवसन होने, आरोग्य अन्न व प्राथमिक गरजा पूर्ण होणे अपेक्षित आहे. दरम्यान, पुरामुळे जामनेर व चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.
भडगावात बहुसंख्य घरांची पडझड झाली आहे. जामनेर तालुक्यातही घरांचे नुकसान झाले आहे. तसेच जळगाव जिल्हयामधील तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. असे असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग पाहिजे तसा सक्रिय होताना दिसत नाही. अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग,व आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी या संकट काळी मदतिला धावून आल्याच दिसत नाही. जर आपत्ती व्यवस्थापन विभागाने पर्जन्य अनुमानानुसार पूरस्थिती कागदोपत्री न पाहता प्रत्यक्ष परिस्थिती पाहून संबंधित तालुके व गावांना सतर्कतेचा इशारा देऊन त्यांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी आपली कंबर कसली असती तर आज बोरी नदीत पूर आल्याने वाहतूक व संपर्क तुटल्याच्या कारणे एका 13वर्षीय चिमुकलीचा जीव गेला नसता. ओझर येथील घराचे छत्र उडाले नसते.आणि जनावरांचे जीव गेले नसते.
महाराष्ट्र् राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तरतुदी नुसार आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षितेचि जबाबदारी ही संबंधित तालुका व जिल्हा व्यवस्थापन विभागाची आहे. त्या अनुषंगाने सदर घटनांना शह देण्यासाठी आप आपल्या परीने विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच राजकीय प्रतीनिधी यांची जबाबदारी पाडली पाहिजे. असा सूर सदरील घटनास्थळी झालेल्या नुकसानी कडे पाहता म्हणता येईल.