<
नाशिक(विमाका वृत्तसेवा)- विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त (महसुल) गोरक्ष गाडीलकर यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
राज्य शासनाच्या आदेशान्वये कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू असल्याने विभागीय लोकशाही दिन विभागातील दहा विभाग प्रमुखांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त श्री. गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.