<
फिजिओथेरपी दिनानिमित्त रेड क्रॉस आयोजित अस्थिरोग आणि फिजिओथेरपी शिबिराप्रसंगी डॉ .प्रशांत भुतडा , डॉ. प्रतिभा औंधकर, डॉ . दीप्ती वाधवा देवरे, डॉ .क्षितिज कौशिक , डॉ .दीप देवधर आदीं समवेत उपस्थित डॉक्टर्स आणि कर्मचारी वृंद दिसत आहे
नाशिक : इंडियन रेडक्रॉस सोसायटी , मविप्र चे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट, वुमन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग निदान, फिजिओथेरपी शिबिर रुग्णांच्या उत्तम प्रतिसादात संपन्न झाले. जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त आयोजित या शिबिरात कोविड विषयक सर्व खबरदारी घेण्यात आली. शिबिरात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रशांत भुतडा, फिजिओथेरपिस्ट डॉ.दीप्ती वाधवा देवरे, डॉ. पक्षा कांबळे, डॉ. क्षितिज कौशिक, डॉ. सुरज मेंगाणे, डॉ. दीप देवधर डॉ.रोहीत सोनजे यांनी रुग्ण तपासणी करून यथोचित मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णांच्या हाडांमधील ठिसूळपणा तपासणी तसेच विशेष करून कोविड नंतर सर्व रुग्णांना उपयुक्त फिजिओथेरपी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरार्थीं चे पुढील उपचार अल्प दरात करण्यात येणार आहेत. शिबिर यशस्वितेसाठी रेडक्रॉस सचिव मेजर पी.एम. भगत, डॉ प्रतिभा औंधकर , चंद्रकांत गोसावी आदी प्रयत्नशील होते.