Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वतःतील क्षमता ओळखत शिक्षकांनी लिहितं-वाचतं व्हावं! – डॉ.गौरी राणे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
09/09/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
स्वतःतील क्षमता ओळखत शिक्षकांनी लिहितं-वाचतं व्हावं! – डॉ.गौरी राणे

जळगाव(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या मनोविश्वात जी उलथापालथ सुरु असते ती जाणून घेत शिक्षकांनी त्यांच्याशी संवाद साधायला हवा, त्यांच्या पातळीवर जात बोलायला हवं आणि स्वतःतील क्षमता ओळखत शिक्षकांनी स्वतः लिहितं-वाचतं होतंं संदर्भग्रंथाचं लेखन करावं, असं प्रतिपादन बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गौरी राणे यांनी केले.

के.सी.ई.सोसायटी आणि लेवा एज्युकेशनल युनियनचे शालेय समन्वयक तसेच लेखक चंद्रकांत भंडारी यांनी लिहिलेल्या ‘देव माणसं अन् गुणी लेकरं’ या प्रशांत पब्लिकेशन्सचे प्रकाशित केेलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी बोलतांना डॉ. गौरी राणे पुढे म्हणाल्या, “प्रसिद्धी पासून नेहमीच दूर राहणार्‍या आणि ग्रंथांवर मनापासून प्रेम करणार्‍या भंडारींनी नेहमीच प्रयोगशील राहत आपले सारं लिखाण केलं आहे. विविध विषयांवर सहज साध्या भाषेत लिहित मराठी साहित्यात आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे.

संस्थेच्या धांडे सभागृहात झालेल्या या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी नंदिनीबाईच्या मुख्याध्यापिका सी.एस.पाटील यांनी पुस्तकाचा थोडक्यात परिचय करुन देत विविध विषयांवर लेखन करणार्‍या भंडारींच्या पुस्तकाचे स्वागत केले. कार्यक्रमाला खडके प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अंजना सुरवाडे, प्रशांत पब्लिकेशनचे रंगराव पाटील, प्रदीप पाटील तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक चंद्रकांत भंडारी यांनी केले. तसेच त्यांनी आभारही मानले.

Team Satymev Jayate

Previous Post

डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी डॉ. महेश चौधरी

Next Post

युवापिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post
लोकप्रतिनिधित्व ही जनसेवेकरिता मिळालेली उत्तम संधी – राज्यपाल

युवापिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo