<
रावेर(प्रतिनिधी)- तालुक्यासह परिसरात होत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पुनखेडा येथील भोकर नदीला पाणी येऊन पुलाखालून वाहत आहे. यामुळे परिसरातील तसेच गावातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात फायदा होतो. त्यामुळे गावकरी, शेतकरी यांच्यात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. नदीला आलेल्या पुरामुळे खोल गेलेली भुजल पातळीत वाढ होऊन परिसरातील विहिरीची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुनखेडा येथील शेतकरी, ग्रामस्थांकडून भोकर नदी ची पूजा करून साडी चोळी अर्पण करण्यात आली. यावेळी पुनखेडा येथील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.