<
जामनेर(प्रतिनिधी)- आज जामनेर तालुक्यातील जामनेर ओझर या गावात आलेल्या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केली चक्रीवादळ, अतिवृष्टी, दरडी कोसळणं अशा अनेक संकटांना जळगाव जिल्हा सामोरा जातोय.
या वेळी अनिल चौधरी म्हणाले सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माणसांना आधार द्यावा लागेल, त्यांना सुविधा द्याव्या लागतील, त्यांचा वाहून गेलेला संसार सावरण्यास मदत करावी लागेल. अनेकांची शेती नष्ट झालीय, पशुधनाची मोठी हानी झालीय. त्यांच्या जगण्याचं साधन हिरावलं गेलंय. रस्ते वाहून गेलेत. त्यामुळं या लोकांना आधार देणं, हवी ती मदत करणं, त्यांच्या जिद्दीला बळ देणं, मोडलेल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी सहकार्य करणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात एकटेपणाची भावना निर्माण होऊ न देता आपल्यामागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे याची जाणीव व्हावी, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. माझ्यापरीने शक्य ते प्रयत्न मी करतोय. इतरही अनेक लोक, स्वयंसेवक, सामाजिक संस्था, सरकार असे अनेकजण आहेत.
यात तुम्हीही जमेल तेवढा वाटा उचलला तर आपल्या भावा-बहिणींना निश्चितच मोठा आधार होईल.या साठी अनिल चौधरी व प्रहार पक्षाच्या ‘एक हात मदतीचा’ या संकल्पेनतून नुकसानग्रस्त गरीब गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप करण्यात आलेयावेळी प्रहारचे आझोर गावाचे सरपंच साहेबराव खायवाडे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संजय आवटे, जामनेर तालुका अध्यक्ष प्रदीप गायके, जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज महाले, जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख जीवन सपकाळ, भुसावळ तालुका अध्यक्ष अक्षय पाटील निखिल चौहान, सुरेश महाजन, राजू महाजन, बाळू पाटील व सर्व प्रहार सेवक पदाधिकारी उपस्थित होते.