<
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन विशेष
जळगांव(प्रतिनिधी)- आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो.या दिवसाच महत्व इतर जागतिक दिनाच्या थोडं वेगळं आहे, व त्याच अनन्य साधरण अस महत्व आहे. जगभरातील आत्महत्याचा विचार केला असता त्या मागील कारणांचा शारीरिक, मानसिक,व त्या घटनांचा समाजावर पडण्याऱ्या परिणामांची दखल घेऊन त्याला प्रतिबंध करण्यासाठी “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन” साजरा केला जातो.
मात्र गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील आत्महत्येच्या आकड्याने प्रमाण वाढले आहे हे सरासरी आत्महत्या चे आकडे पाहता दिसून येते.महिन्याला सात ते आठ आत्महत्या ह्या नुसत्या जिल्ह्यात होतात ही विचार करण्याजोगी बाब आहे. जळगावात विविध घटनांतून झालेल्या आत्महत्या पाहता कौटूंबिक कलह, सोशियल मीडियाचा अती वापर, भावनिक वातावरणातील बदल, मानसिक औसाद ,अपेक्षा भंग आदी कारणांनी झाल्याचं दिसते. सद्यस्थितीत सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव व छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून कोणताच विचार न करता आत्महत्येचा मार्ग अनेकजण स्विकारत असतात. त्यामुळे दररोज मीडियाच्या माध्यमातून आत्महत्येच्या घटना समोर येताना दिसतात.
मात्र, आत्महत्या म्हटले की, एखाद्या संकाटाला समोरी न जाता त्यापासून पळ काढण्यासारखे आहे. प्रत्येकांच्या आयुष्यात संकटे, अडचणी या येतच असतात. मात्र, त्याच्यावर मात करून मार्ग काढण्यापेक्षा तरूणपिढी आत्महत्येचा मार्ग स्विकारताना दिसतात. आत्महत्या करण्याचे मुख्य कारण म्हणजे तणाव आहे.सोशल मीडियाचा वाढता प्रभाव व्यक्तीवर सध्या फार पडत आहे. त्यामुळे लोकांच्या डोक्यात काही चुकीचे संस्कार घडतात त्याचा चुकीच्याच पद्धतीने शेवट केला जातो. एखाद्या गोष्टीबद्दल निर्माण होणारे प्रेम किंवा भावना पुर्ण न झाल्यास व्यक्ती तणावाखाली जातो. याचा थेट मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो.घरातील वातावर हे सध्या बिघडत चालल्याचे ही काही वेळस आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे तणावाखाली असलेल्या व्यक्तीला शांतता न मिळाल्यास ही आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते.या कारणांपासून सुटका करण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडे जाऊन जाणवत असलेल्या तणावाबद्दल सांगावे. तसेच मनात येणारे नकारात्मक विचार दूर करण्यासाठी काही वेळ एखाद्या आवडत्या गोष्टीत गुंतवावे.घरातील मंडळींसाठी तणावातून थोडा वेळ काढा. मित्रमैत्रीनीना भेटण्यासाठी बाहेर फिरायला जावे. तसेच एकमेकांच्या समस्या जाणून समजून घेतल्यास एकमेकांत प्रेमाची भावना वाढेल. तसेच स्वत:ला कधी एकटे न वाटू देता सर्वांमध्ये मिळून मिसळून रहावे.
जिल्ह्यात मानसिक आरोग्य राखण्यासाठी शासकीय रुग्णालय व सेवाभावी संस्था, व्यसनमुक्ती केंद्र तसेच कौंसेलिग सेन्टर मोठ्या प्रमाणात आहेत तरीही जिल्ह्यात आत्महत्या होतात ही बाब विचार करणारी आहे. जिल्ह्यातील आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जन सेवक, एन जी ओ संस्था,आणि पथनाट्यातून समाज जागृती करणाऱ्या मंडळांनी प्रयत्न करून आत्महत्या रोखण्यास मदत केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केल्याचा संकल्प पूर्ण होऊल असे म्हणता येईल.