<
जळगाव (प्रतिनिधी) – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे आणि मनपा समूह साधन केंद्र क्रमांक नऊ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या ‘शिक्षकांना नेशन बिल्डर अॅवार्ड-2021‘ प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये जैन इरिगेशनचे सहकारी प्रसाद साकरे यांच्या पत्नी सुनीता सिमाले (क्रिडा रसिक सोसायटी संचालित प्राथमिक शाळा) यांना गौरविण्यात आले.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यास प्रांतपाल रमेश मेहेर, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, अध्यक्ष उमंग मेहता, माजी मानद सचिव सुनील आडवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनिता शिवाजी सिमाले यांच्यासह सुचिता भिमराव बाविस्कर (मनपा शाळा क्र 38), जयश्री सुकलाल पाटील(गी. न.चांदसरकर विद्यालय), अनिल दादाभाऊ शितोळे (नूतन मराठा माध्य विद्यालय), किरण तुळशीराम चौधरी (भगीरथ माध्य विद्यालय), नरेंद्र एकनाथ वारके (कमल राजवानी बाल निकेतन), मनोहर भजनलाल तेजवानी (आदर्श सिंधी माध्य विद्यालय), सागर इच्छाराम झांबरे ( शारदा प्रा. शाळा), राजेंद्र साहेबराव पाटील( शिक्षण शास्त्र विद्यालय नूतन मराठा) या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षकांना पुरस्कार, शाल, श्रीफळ प्रदान करुन कुटुंबीयासह सन्मानित करण्यात आले. रोटरी गोल्डसिटीतर्फे पुरस्कारासाठी शिक्षकांकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता समाज माध्यम, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तसेच पालकांकडून आलेल्या प्रतिसाद यावर सत्कारार्थी शिक्षकांची निवड करण्यात आली. यावेळी प्रांतपाल मेहेर आणि राजीव शर्मा यांनी मार्गदर्शन केले. सूत्र संचालन अशोक सौंदाणे यांनी तर परिचय चंदर तेजवानी यांनी केला. नंदू आडवाणी यांनी आभार मानले.