Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करा -कृषिमंत्री दादाजी भुसे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
11/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांशी संवेदनशिल राहून त्यांना न्याय देण्याचे काम करा – कृषी मंत्री दादाजी भुसे

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- चाळीसगाव शहरासह तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह झालेल्या अन्य नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनास सादर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात येईल, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

चाळीसगाव, भडगाव पाचोरा तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर आणि डोंगरी या नद्यांना पूर आले. त्यात एक महिला वाहून गेली, तर शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री श्री. भुसे यांनी आज सकाळी चाळीसगाव तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडेसह पाचोरा तालुक्यातील दिघी, भोरटेक, कजगाव, ता. भडगाव या गावांना भेट देऊन तेथील पूर परिस्थितीची पाहणी करून नागरिकांसह शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे (चाळीसगाव), चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्यासह तीनही तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदी उपस्थित होते. कृषी मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, गेल्या काही दिवसांत या भागात दोन वेळा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे.

या नुकसानीची दखल राज्य शासनाने घेतली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर मदतीबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पंचनाम्यांची कार्यवाही प्रशासनाने तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा. तसेच पावसामुळे शेतीचे जे नुकसान होते. ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचाही आढावा घेण्यात येईल, असेही कृषी मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

यावेळेस मंत्री श्री. भुसे यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले व शेतकऱ्यांना धीर दिला.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

‘ई-पीक पाहणी’ शेतकऱ्यांसाठी नव्या युगाची सुरूवात -महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Next Post

डॉ. उज्वला चक्रदेव यांची नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

Next Post
डॉ. उज्वला चक्रदेव यांची नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

डॉ. उज्वला चक्रदेव यांची नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d