<
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील घाट रोड येथील प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण व तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे यांनी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य लसीकरण शिबिराचे आयोजन केले असता या शिबिरास रामवाडी, काँग्रेसवाडी, आदित्य नगर, भोई गल्ली, नागद रोड, झोपडपट्टी, अहिल्यादेवी नगर परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन १२६५ लाभार्थींनी मशीन चा लाभ घेतला.
यात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.लसीकरणासाठी करावी लागली लागणारी ऑनलाईन नोंदणी कार्यकर्त्यांनी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर करून घेतल्यामुळे शिबीर स्थळी ऑनलाईन नोंदणी साठी अडचण आली नसल्याने शिबिरात जलद गतीने लसीकरण झाले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदार करंबळेकर डॉक्टर बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान भाऊ धाडीवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याच प्रमाणे लसीकरणासाठी सिस्टर प्रज्ञा लोखंडे, जयश्री चव्हाण, किशोर पाटील, भुषण महाजन, चेतन गुढेकर, योगेश्वरी ठोसरे, दिपाली खेडकर यांनी मोठ्याप्रमाणावर मेहनत घेऊन सहकार्य केले.
लसीकरण यशस्वीतेसाठी पांडुरंग बोराडे, प्रभाकर उगले, सुनील गायकवाड, दिनेश घोरपडे, ज्ञानेश्वर गायके, अतुल चव्हाण, सुभाष राठोड, ऋषिकेश आप्पा देवरे, शाम भवर, सोमनाथ साळुंखे, गणेश भवर, गौरव घोरपडे निलेश गुंजाळ, पितांबर कोळी, सचिन घोरपडे, अजय घोरपडे, सचिन पाटील, बबलू चव्हाण, विकी राठोड, अभिषेक गुंजाळ, योगेश बोराडे, सचिन गुंजाळ, सुमित शेळके, सागर आगोणे, लोकेश राजपूत, करन चित्ते, रोहित बोराडे, रोहित गुंजाळ, सागर अहिरे, मनोज जाधव, मनोज कोळी, शुभम शिंदे, राहूल बोराडे, सचिन बोराडे, प्रविण चव्हाण आदी असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.