<
जळगांव(चेतन निंबोळकर)- या दौऱ्याचा दरम्यान ओझर व इतर गावंमधे उद्भवलेली पुर परिस्थिती दरम्यान झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी व धान्य व खाद्य पदार्थांची मदत पोहचवण्यासाठी हा दौरा होता.
नुकसान झालेल्या भागाची पाहाणी करून त्या संबंधित अहवाल सुध्दा बनवले आणि संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिवांशी संपर्क साधून तिथल्या स्तिथीची माहिती दिली, अहवाल लवकरात लवकर सादर करून संबंधित लोकांना तात्काळ मदत द्या आणि सर्वे ऑफलाईन पद्धतीने करावा अशी मागणी खान्देश युथ आर्गेनाइजेशन ने कृषी मंत्र्यांना केली असता त्यांनी सुद्धा होकार दिले, सोबत संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्र्यांशी देखील संपर्क साधून त्यांना या विषयी माहिती दिली असता लवकरात लवकर मदत दिली जाईल असे आश्वासन दिले गेले.