<
जामनेर(प्रतिनिधी)- भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व ह्युमन राईट्स संघ तसेच स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार सघटनेच्या वतीने आज रोजी जामनेर बाबाजी राघो मंगल कार्यालय येथे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर करण्यात आला असून जामनेर तालुक्याचे नगराध्यक्षा साधना ताई महाजन यांच्या हस्ते तालुक्यातील २५१ शिक्षकांना २०२१ चा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले.
या कार्यक्रमा ठिकाणी नगराध्यक्षा साधनाताई महाजन,जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे, तहसिलदार अरूण शेवाळे, जितूभाऊ पाटील,जामनेर नगरपरिषद चे गटनेते डाँ.प्रंशात भोंडे,नगरसेवक आतिष झाल्टे, पंचायत समितीचे सभापती जलाल तडवी, जामनेर गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, संचालक जितू गोरे,दिपक पाटील,महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रिकांत मोरे,राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट्स संघ तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि स्वराज्य नारीशक्ति संघाचे माधुरी कुळकर्णी, व्यासपीठावर पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सहभागी ह्युमन राईट्स जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हर्षल बोरशे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळू चवरे, पुष्पाताई पाटील, तालूकाध्यक्ष आश्विनी रोकडे, तालुका उपाध्यक्ष उज्वला चवरे व तालुका सल्लागार रविंद्र सुर्यवंशी,आदी पदाधिकाऱ्यांनी यशस्वीरीतीने कार्यक्रम पार संपन्न केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप सर यांनी करून आभार अश्विन रोकडे सर यांनी केले.