Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पत्रकारांच्या नेत्र तपासणीला उदंड प्रतिसाद; पाचोरा रोटरी क्लब तर्फे पत्रकारांचे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
पत्रकारांच्या नेत्र तपासणीला उदंड प्रतिसाद; पाचोरा रोटरी क्लब तर्फे पत्रकारांचे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

पाचोरा(प्रतिनिधी)- येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव व तेजोदीप नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. पाचोरा भडगाव येथील सुमारे 50 पत्रकारांनी या शिबीराचा लाभ घेतला.

येथील रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील संचलित तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त तेजोदीप नेत्र रुग्णालय व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी खास पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट चे उपप्रांतपाल राजेश मोर, जेष्ठ सदस्य भरत काका सिनकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील, रोटेरियन चंद्रकांत लोढाया, डॉ. गोरख महाजन, डॉ. अमोल जाधव, रो. निलेश कोटेचा, रो. पवन अग्रवाल डॉ.पवनसिंग पाटील, डॉ. प्रशांत सांगडे, रो. अतुल शिरसमणे, डॉ. कुणाल पाटील, डॉ. सचिन चौधरी, रावसाहेब बोरसे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकरा वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा पत्रकारांसमोर सादर केला. समाजातील पत्रकारांची भूमिका व रोटरी क्लबच्या बातम्यांना मिळणारी प्रसिद्धी या बाबत त्यांनी पत्रकारांचे आभार मानले यावेळी डॉ. गोरख महाजन, पत्रकार शांताराम चौधरी, अनिल बाबा येवले, यांचीही समयोचित भाषणे झालीत. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. सी. एन.चौधरी यांनी समाजातील पत्रकारांची भूमिका स्पष्ट केली व पत्रकारांसाठी पहिल्यांदाच आयोजित अशा आगळ्या-वेगळ्या शिबिरा बद्दल डॉ. बाळकृष्ण पाटील आणि रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चे ऋण व्यक्त केले.

आयोजकांतर्फे उपस्थित सर्व पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारातर्फे पत्रकार प्रा सी. एन. चौधरी यांच्या हस्ते तेजोदीप नेत्र रुग्णालयाचे संचालक डॉ. बाळकृष्ण पाटील यांना सन्मानित करण्यात आले. उद्घाटन समारंभ नंतर उपस्थित सर्व पत्रकारांची नेत्र तपासणी करण्यात आली. या नेत्र तपासणी ला डॉक्टर बाळकृष्ण पाटील यांचे समवेत त्यांचे सहकारी गोपाल पाटील, हर्षल अहिरे, तसेच ऑप्टिशियन संतोष पुर्सनानी व सचिन पुर्सनानी यांचे सहकार्य लाभले. सुमारे 55 पत्रकार बांधव या शिबिराला उपस्थित होते पैकी 50 पत्रकारांची नेत्र तपासणी करण्यात आली.

ग्लोबल महाराष्ट्र चे संपादक व शिबिराचे प्रोजेक्ट डायरेक्टर शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहावे

Next Post

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा 7 वा वर्धापन दिन; जलगांव जिल्हा मोबाईल रिटेलर असोसिएशन यांच्या संयुक्त प्रयत्नातुन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d